कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणी संदर्भात आज मुंबईच्या आझाद मैदानावर शेतकऱ्यांचे आंदोलन झाले. या आंदोलनासाठी राज्याभरातील विविध जिल्ह्यातील हजारो शेतकरी मुंबईत दाखल झाले होते. मात्र, किसान सभेला मुंबईत आंदोलन करण्याची काहीच गरज नव्हती. केवळ पब्लिसिटी स्टंट म्हणून हे आंदोलन करण्यात आले आहे, असा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना रामदास आठवले म्हणाले आहेत.
“केंद्र सरकारने कायदा केला असून तो मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही. शेतकऱ्यांनी आता आंदोलन थांबवायला हवे, असे आठवले यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही सध्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. केंद्र सरकारनेही दोन वर्षांसाठी हे कायदे लागू न करण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे, असे रामदास आठवले म्हणाले आहेत. याशिवाय केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार करत आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सरकार बोलणे ऐकून घेतले पाहिजेत, असेही रामदास आठवले म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Rohit Pawar On Nilesh Rane: कोणताही विषय अभ्यास करून मांडला पाहिजे; निलेश राणे यांच्या 'त्या' वक्तव्याला रोहित पवार यांचे प्रत्युत्तर
दरम्यान, रामदास आठवले यांनी केलेल्या वक्तव्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात थिणगी पडली आहे. रामदार आठवले यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे काँग्रेसने आक्रमक भुमिका घेतली आहे. तसेच या वक्तव्यासाठी रामदास आठवले यांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे.
कृषी कायद्यावरून गेल्या काही महिन्यांपासून भाजप आणि त्यांच्या विरोधकांमध्ये चांगलीच जुपली आहे. कृषी कायद्याला भाजपच्या नेत्यांकडून समर्थन केले जात आहे. तर, या कायद्याला काँग्रेसने विरोध दर्शवला आहे.