नाशिक (Nashik) मधील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे लॉकडाऊनची (Lockdown) शक्यता वर्तवली जात होती. मात्र तुर्तास तरी नाशिकमध्ये लॉकडाऊन होणार नसल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर लॉकडाऊन करण्यापूर्वी निदान 3 दिवसांचा अवधी देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. नाशिकमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Curfew in Nandurbar: नंदुरबार जिल्ह्यात 15 दिवस संचारबंदी; 'या' कालावधीत सुरु राहणार अत्यावश्यक सेवा)
सरकारी रुग्णालयातील बेड कमी पडल्यास खाजगी रुग्णालयातील 80 टक्के ताब्यात घेण्यात येतील. सिव्हिल हॉस्पिटल्समध्ये सुमारे 300 बेड्स वाढवण्यात येतील. नाशिक ग्रामीण आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकूण 196 व्हेटिंलेटर्स उपलब्ध आहेत आणि अजून 23 व्हेटिंलेटर्स इन्स्टॉल करण्यात येणार आहेत, असे भुजबळ यांनी सांगितले. (Coronavirus: जालना जिल्ह्यात प्रत्येक पंधरा दिवसानंतर केली जाणार कामगारांची कोरोनाची तपासणी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश)
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा पुरेपूर वापर करण्यात यावा. प्रत्येक तालुक्यात किमान एक हॉस्पिटल कोरोना रुग्णांसाठी देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, मागील जून महिन्यात 10 हजार कोविड टेस्ट करण्यात येत होत्या. मात्र आता दिवसाला 10 हजार टेस्ट करण्यात येत आहेत. तसंच कोरोना बाधित रुग्णांना घरात विलगीकरणात राहणे शक्य नसल्यास त्यांना ताबडतोब कोविड सेंटरमध्ये दाखल करावे, असेही भुजबळांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, आज राज्यात 43,183 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून 249 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 32,641 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या नव्या वाढीनंतर राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 28,56,163 वर पोहचला असून 54,898 मृतांची नोंद झाली आहे. सध्या राज्यात 3,66,533 सक्रीय रुग्ण असून 24,33,368 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे कठोर निर्बंधांचे संकेत आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत.