Theft in Navneet Rana's House:  नवणीत राणा यांच्या मुंबईतील घरात चोरी, फरार नोकरावर गुन्हा दाखल
Navneet Rana |

Theft in Navneet Rana's House:  लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी चालू असताना अमरावती लोकसभाचे खासदार नवणीत राणा यांच्या घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. चोरीच्या घटनेनंतर पोलिस ठाण्यात नवणीत राणा यांच्या घरातील नोकराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खार पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अर्जुन मुखिया असं आरोपी नोकराचे नाव आहे. (हेही  वाचा- नाशिकच्या गोवर्धन गावातील लोकांची 20 मे रोजी मतदानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा

मिळालेल्या माहितीनुसार, राणा दामप्त्यांचे मुंबईतील खार परिसरात मालकीचे घर आहे. घरात घरगडी म्हणून अर्जून गेल्या १० महिन्यांपासून काम करत होता. मार्च महिन्यात होळी निमित्त तो गावी गेला तो परतलाच नाही. अर्जुन मुळचा बिहारचा आहे. अनेकदा रवी राणा यांच्या स्वीय सचिव यांने फोन केला परंतु उचललाच नाही. दोन महिन्यांपूर्वी घरातील कपाटात दोन लाख रुपये ठेवले होते. सोमवारी कपाटात पैसे आढळून आले नाही. संपुर्ण घरात तपासणी केली परंतु ते २ लाख रक्कम घरात नव्हती.

स्वीय सचिव यांनी राणा यांना घटनेची माहिती दिली. त्यांना नोकर अर्जून याचावर संशय आला. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देत त्यांनी नोकरावर गुन्हा दाखल करण्यात आला. खार पोलिसांनी एक पथक बिहारला पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.