Madhuri Misal (Photo Credit: Twitter)

पुणे (Pune) येथील पर्वती (Parvati) मतदार संघाच्या आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांच्या बंगल्यात चोरी झाली आहे. मिसाळ यांच्या वानवडी येथील घरातून 18 लाख रुपये किंमतीच्या दागिन्यांची चोरी झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी वानेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. माधुरी मिसाळ यांच्या घरी काम करणाऱ्या कामगार महिलेनेच या दागिन्यांची चोरी केली आहे, अशी तक्रार माधुरी मिसाळ यांची जाव ममता दिपक मिसाळ यांनी केली आहे. सध्या वानेवाडी पोलिसांनी त्या कामगार महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी ममता मिसाळ या पती दीपक, मुले आणि जावू माधुरी मिसाळ यांच्यासोबत वानवडी येथील फेअर रोड येथे एकत्रित राहतात. दरम्यान, ममता यांना 28 नोव्हेंबरला त्यांच्या नातेवाईकाच्या येथे संभारंभाकरिता जायचे होते. त्यावेळी त्यांनी बेडरूममध्ये ठेवलेले दागिने पाहण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, त्यामध्ये हिरे मोत्यांचा हार आणि कडा सापडला नाही. त्यानंतर सर्व ठिकाणी शोधाशोध केली. तरीही दागिने सापडले नाहीत. मिसाळ यांच्या घरात घर कामासाठी काही महिला काम करतात. त्यातील काही महिला बेडरूम साफसफाईचे कामदेखील करतात. त्यानुसार, वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या कामगार महिलेचा शोध घेत आहेत. हे देखील वाचा- Sharad Pawar 80th Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी, संजय राऊत यांच्यासह मान्यवरांकडून शरद पवारांना वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा

भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनी पर्वती विधानसभा मतसंघात सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये त्यांनी अश्विनी कदम यांचा पराभव केला होता.