First Under Water Metro: लवकरच धावणार पाण्याखालची मेट्रो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन
under Wtaer Metro,

First Under Water Metro: विज्ञान तंत्रज्ञानाच्या वाढत्या विकासामुळे मेट्रोचे जाळे पसरत आहे. लवकरच भारतात पाण्याखालची मेट्रो धावणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक भारतीयांचे स्वप्न साकार होणार आहे. येत्या 6 मार्चला पंंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकता येथील देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रो (पाण्याखालील मेट्रो) बोगद्याचे उद्घाटन करणार आहे. यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगाल आणि बिहराला भेट देणार आहेत. ही मेट्रो हावडा मैदान ते एस्प्लेनेड पर्यत धावणार आहे. (हेही वाचा- लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना दिला 'हा' इशारा)

मिळालेल्या माहितीनुसार, 6 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकता येथे कोट्यवधी रुपयांच्या कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहे. कोलकता मेट्रोच्या हावडा मैदान- एस्प्लेनेड मेट्रो सेक्शन, कवी सुभाष स्टेशन, हेमंत मुखोपाध्याय मेट्रो सेक्शन आणि तरातला- माजेरहाट मेट्रो सेक्शनचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. मेट्रोचे खास विशेषण म्हणजे बोगदा हुगदी नदीच्या पातळीपासून 32 मीटर खाली धावेल. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ती सेक्टर V ते हावडा पर्यंत धावेल.  हुगळी नदीच्या खाली धावणारी देशातील पहिली पाण्याखालील मेट्रो रेल्वे नदी आणि हावडा यांना कोलकाता शहराशी जोडेल.

या आधीच मेट्रोची ट्रायल रन करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. नदी खालच्या मेट्रो बोगद्याचे काम जोरात सुरु होते. नदी खाली मेट्रो सुरु झाल्यामुळे, पूर्व पश्चिम मेट्रो हावडा ग्राउंडवरून हुगळी नदीत बांधलेल्या बोगद्याद्वारे सॉल्ट लेक सेक्टर 5 पर्यंत पोहोचू शकते. त्याची एकूण लांबी अंदाजे 16.5 किमी आहे. हे एकमेव मेट्रो स्टेशन आहे जे थेट रेल्वे ट्रॅक प्लॅटफॉर्मच्या वर बांधले गेले आहे.