महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने (Coronavirus) अक्षरश: धुमाकूळ घातला असून दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या देखील वाढत चालली आहे. महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, मागील 24 तासांत राज्यात 22,084 नवे रुग्ण आढळले असून राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 10 लाख 37 हजार 765 वर (COVID-19 Cases) पोहोचली आहे. तर दुसरीकडे राज्यात 13,489 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. यामुळे राज्यात कोरोनावर मात केलेल्या रुग्णांच्या आकडा 7 लाख 28 हजार 512 वर (COVID-19 Recovered Cases) पोहोचला आहे. राज्यात मागील 24 तासांत 391 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात सद्य घडीला 2 लाख 79 हजार 768 रुग्ण (COVID-19 Active Cases) कोरोनावर उपचार घेत आहेत. यामुळे राज्यातील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70.2% इतके झाले आहे. तर मृत्यूदर 2.81% इतका झाला आहे. राज्यात आतापर्यंत 51 लाख 64 हजार 840 कोरोना चाचण्या झाल्या असून त्यातील 10 लाख 37 हजार 765 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सद्य स्थितीत राज्यात 16,52,955 रुग्ण हे होम क्वारंटाईन असून 38,275 रुग्ण हे संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. Coronavirus in Pune: कोरोना विषाणू संकटात लग्न करण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाचा नवा नियम; पोलिसांकडे सादर करावे लागणार लग्नाचे Video Recording
Maharashtra reports 22,084 new #COVID19 cases, 13,489 discharges and 391 deaths today. The total number of cases in the state rises to 10,37,765 including 7,28,512 recoveries and 2,79,768 active cases: Public Health Department, Maharashtra pic.twitter.com/oysi6JKqMw
— ANI (@ANI) September 12, 2020
देशात 46,59,985 वर कोरोना बाधितांचा आकडा आता देशात झाला आहे. तर 9,58,316 अॅक्टिव्ह रुग्ण संख्या असून 36,24,197 जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच एकूण 77,471 जणांचा बळी गेला आहे. कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच कोविड योद्धे सुद्धा सध्याच्या कोरोनाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांवर अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. दुसऱ्या बाजूला कोरोनावर अद्याप ठोस लस उपलब्ध नसल्याने त्याच्या संदर्भात जगभरातील संशोधक अभ्यास करत आहेत.