महाराष्ट्रात (Maharashtra) दररोज हजारोच्या संख्येने कोरोना (Coronavirus) रुग्ण आढळून येत आहेत. राज्यात हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबई (Mumbai), पुणे (Pune), नाशिक (Nashik), नागपूर (Nagpur) इत्यादी रुग्णालयातील बेड्सची कमतरता जाणवू लागली आहे. आयसीयू आणि वार्ड भरल्यानंतर रुग्णालयाच्या परिसरात रुग्णांवर उपाचार केले जात आहेत. दरम्यान, मुंबईतील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. मुंबईत गेल्या 3 दिवसांत 31 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 77 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत दिवसेंदिवस वाढणारी कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे.
मुंबईत रविवारी (4 मार्च) 11 हजार 563 रुग्ण आढळले होते आणि 25 जणांचा मृत्यू झाला होता. सोमवारी (5 मार्च) 9 हजार 857 रुग्ण सापडले होते तर, 21 जण मरण पावले होते. त्यानंतर मुंबईत आजही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत आज तब्बल 10 हजार 30 रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 31 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे मुंबईत गेल्या 3 दिवसांत एकूण 31 हजार 450 रुग्णांची नोंद झाली आहे. तर मृतांचा आकडा 77 वर पोहचला आहे. हे देखील वाचा- Dr Babasaheb Ambedkar's 130th Birth Anniversary: घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन; चैत्यभूमी येथील स्मारकस्थळावरून होणार थेट प्रक्षेपण
ट्वीट-
6-Apr, 6:00pm#NaToCorona pic.twitter.com/7Ue1Cin3vA
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 6, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत 92 टक्के आयसीयू आणि 93 टक्के व्हेंटिलेटर बेड्स फूल झाले आहेत. नाशिक रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत. पुण्यात आयसीयू- ऑक्सिजन सुविधा वाले बेड्स फूल झाले आहेत. केवळ 79 व्हेंटिलेटर रिकामे आहेत. नागपूरमध्ये एकाच बेडवर दोन रुग्णांना उपचार घ्यावे लागत आहेत.