Accident PC PIXABAY

Pune Accident: परभणी येथून वारकऱ्यांना घेऊन जाणारा टेम्पो अचानक उलटला. यात 20 भाविक जखमी झाले. कोंढवा-कात्रज रस्त्यावरील (Kondhwa-Katraj Road) शिवशंभोनगर येथे रविवारी रात्री हा अपघात (Accident) झाला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti University Police) टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जखमी वारकऱ्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नवनाथ लक्ष्मणराव चोपडे (रा. धार, जि. परभणी) असे टेम्पो चालकाचे नाव आहे. प्रयागबाई नारायण बोखारे (वय 72, रा. फुटा गाव, जि. परभणी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. या टेम्पोचा वापर करून परभणी जिल्ह्यातील भाविक पालखी सोहळ्यात सहभागी होत होते. (हेही वाचा -Palghar Accident: भरधाव दुचाकी आणि रिक्षाच्या धडकेत शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू; 6 गंभीर जखमी)

रविवारी रात्री ते त्यांच्या थांब्याकडे जात होते. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील शिवशंभोनगर परिसरातील लेन क्रमांक एकमधून जात असताना चालक चोपडे यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. टेम्पो पलटी झाल्याने आत बसलेले 20 वारकरी किरकोळ जखमी झाले. बोखारे यांच्या डोक्याला व हाताला दुखापत झाली असून मनगट फ्रॅक्चर झाले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. (हेही वाचा:Youth Swept Away in Tamhini Ghat: वीकेंडला सहलीसाठी ताम्हिणी घाटात गेलेला तरुण धबधब्यात वाहून गेला; शोधकार्य सुरू)

रविवारी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखीचे पंढरपुरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. लाखो भाविक या पालखी सोबत पंढरीच्या वारीसाठी पायी निघाले आहेत. महाराष्ट्रात आषाढी वारीनिमित्त दरवर्षी राज्यभरातील भाविक विठूरायाच्या दर्शनासाठी पायी पंढरपुढे जातात. महाराष्ट्रात आषाढी वारीचा सोहळा दरवर्षी मोठ्या भक्तीभावाने पार पडतो.