Palghar Accident: पालघरमध्ये दुचाकी आणि रिक्षाच्या अपघातात(Palghar Accident) शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू (School Student Die)झाला. तर अन्य 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, डहाणू-जव्हार मार्गावर अपघाताची ही घटना घडली. सकाळी 11 वाजता वरोतीजवळ बाईक आणि रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की यात रिक्षाचा चक्काचूर झाला. (हेही वाचा:Youth Swept Away in Tamhini Ghat: वीकेंडला सहलीसाठी ताम्हिणी घाटात गेलेला तरुण धबधब्यात वाहून गेला; शोधकार्य सुरू)
या अपघातात आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. संगीता डोकफोडे (14 वर्षे) असं या अपघातामध्ये मृत पावलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. अपघातात मृत्यू झालेली संगीता वांगर्जे येथून सूर्यानगरला शाळेत जात असताना हा अपघात झाला. या अपघातामध्ये ६ जण गंभीर जखमी झाले आहेत.
रिक्षातील प्रवाशांसह दुचाकीस्वार असे एकूण सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पालघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या सर्वांना तात्काळ कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुंदलवाडी येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रवासी उतरत असल्याने रिक्षा रस्त्याच्या कडेला उभी होती. तेवढ्यात या रिक्षाला दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये रिक्षा पलटी झाली.