प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

आज गुरुवारपासून राज्यभरातील परिचारिकांनी (Nurses) कामबंद (Agitation) आंदोलनपुकारलं आहे. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या राज्यातील सर्वच रुग्णालयातील शाखेच्या परिचारिका सहभागी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यामुळं याचा मोठा परिणाम राज्यभरातील रुग्णसेवेवर पाहायला मिळण्याचा शक्यता आहे. खासगीकरणाला (Privatization) विरोध दर्शवण्यासाठी व इतर मागण्यासाठी परिचारिका संघटनेच्या वतीने 23 मे ते 25 मे पर्यंत राज्यव्यापी आंदोलन केले. मात्र या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे 26 आणि 27 मे रोजी परिचारिका काम बंद आंदोलन करणार आहेत. त्यामुळे राज्यातील शासकीय रुग्णालयात रुग्णसेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

कंत्राटी पदे भरण्यास महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे 23 ते 25 मे पर्यंत राज्यात सर्व प्रशासकीय जिल्ह्यातील रुग्णालयात 1 तास काम बंद आंदोलन आणि निदर्शने करायला सुरुवात झाली होती. मात्र या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली नाही. आजपासून कामकाज बंद आंदोलन करण्यात येत आहे. बुधवारी संचालकांच्या बैठकीत परिचारिकांच्या मागण्यांबाबत कोणताही निर्णय न घेतला गेल्याने परिचारिकांनी आजपासून कामबंद आंदोलन पुकारलं आहे. (हे देखील वाचा: ED Raids On Anil Parab: मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी)

परिचारिकांनी वारंवार सरकारसमोर आपल्या मागण्या मांडल्या होत्या, मात्र त्या पूर्ण न झाल्याने संतप्त झालेल्या परिचारिकांनी आंदोलन पुकारले आहे. आता यादरम्यान शासनाने चर्चेसाठी वेळ दिला नाही तर 28 मे 2022 पासून संपूर्ण राज्यात बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा मीनाक्षी शिंदे यांनी दिली आहे.