बेळगाव जिल्ह्यातील निपाणी जवळ असलेल्या कर्नाटकातील मनगुत्ती गावात रातोरात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला आहे.गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करून हा पुतळा हटवण्यात आला आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे सध्या परिसरात तणावाचे वातावरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कर्नाटक सरकारला वावडे का? असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बी.एस येदियुरप्पा (B.S Yediyurappa) यांना एक पत्र लिहले आहे. कर्नाटक सरकारने (Karnataka Government) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची सन्मानपूर्वक पुनर्स्थापना करावी, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, बेळगावातील घटनेमुळे महाराष्ट्र- कर्नाटकातील व संपूर्ण देशातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील तमाम शिवप्रेमींमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. मनगुत्ती गावातील चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. तेव्हा तो पुतळा हटवण्यासाठी पोलिसांनी दबाव आणला असल्याची माहिती समोर येत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. कर्नाटक सरकारने संबंधितावर कारावाई करून आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची सन्मानपूर्वक पुनर्स्थापना करावी, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. हे देखील वाचा- Nanar Project: पैसे कमावणे हा शिवसेना पक्षाचा एकमेव धंदा आहे; नाणार प्रकल्पावरून भाजप नेते नारायण राणे यांची टीका
एकनाथ शिंदे यांचे ट्वीट-
कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावामध्ये संपूर्ण देशाचे आराध्य दैवत वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवल्याचा #निषेध नोंदवत महाराजांच्या पुतळ्याची सन्मानपूर्वक पुनर्स्थापना करण्याची मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री @BSYBJP यांना केली. @CMofKarnataka pic.twitter.com/t5dMHmMCF1
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 8, 2020
दरम्यान, कर्नाटक सरकारने शिवाजी महाराजांचा हटवलेला पुतळा त्वरित उभा करावा. अन्यथा महाराष्ट्रातील शिवभक्त कर्नाटकात घुसतील, अशा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या नूल गावातल्या गावकऱ्यांनी हा इशारा दिला आहे.