Baba Siddique (फोटो सौजन्य - फेसबुक)

Baba Siddique Murder: माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्येतील मुख्य आरोपी शिवकुमार गौतमच्या अटकेनंतर रोज नवनवीन खुलासे होत आहेत. गोळीबारानंतर तो 30 मिनिटे लीलावती रुग्णालयाबाहेर उभा होता, असा खुलासा आरोपीने केला आहे. बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला की नाही, हे जाणून घेण्यासाठी तो रुग्णालयाबाहेर थांबला होता.

आरोपीने गोळीबारानंतर बदला शर्ट -

शूटरने सांगितले की, त्याने गोळीबारानंतर त्वरीत शर्ट बदलला. त्यानंतर तो हॉस्पिटलच्या बाहेर 30 मिनिटे गर्दीमध्ये उभा होता. सिद्दीकी यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजताच तो तेथून निघून गेला. 66 वर्षीय सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी रात्री 9.11 वाजता मुंबईतील वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या छातीत दोन गोळ्या लागल्या. त्यांनंतर त्यांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्यांचा मृत्यू झाला. (हेही वाचा -Baba Siddique Murder Case: मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी शूटर शिवाला नेपाळ सीमेजवळ अटक)

आरोपीने सांगितले की, सुरुवातीच्या प्लाननुसार, तो उज्जैन रेल्वे स्टेशनवर त्याचे सहकारी धरमराज कश्यप आणि गुरमेल सिंग यांना भेटणार होता, जिथे बिश्नोई टोळीचा सदस्य त्यांना वैष्णोदेवीकडे घेऊन जाणार होता. मात्र, कश्यप आणि सिंग यांना पोलिसांनी पकडल्यामुळे ही योजना फसली. (हेही वाचा -Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी खून प्रकरणात प्लॅन-बी आला समोर; चौकशीत आरोपींनी केले अनेक खुलासे)

गेल्या आठवड्यात मुंबई गुन्हे शाखा आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) गौतमसह अनुराग कश्यप, ज्ञानप्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव आणि अखिलेंद्र प्रताप सिंग यांना नेपाळ सीमेजवळ अटक केली होती.