तीन महिन्यापासून महाराष्ट्र (Maharashtra) शिंदे गट (Shinde Group) विरुध्द ठाकरे गट (Thackeray) सामना बघत आहे. पण गेल्या काही दिवसात असं घडलं की हा वाद आता शिगेला पेटण्याची चिन्ह आहे. दोन दिवसांपूर्वी निवडणुक आयोगाकडून (Election Commission) शिवसेना हे नाव पक्षाचं आणि धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह गोठवण्यात आले आहे. तरी शिंदे- ठाकरे गटास नवे पक्षाचे नाव (Party Name) आणि पक्षाचे चिन्ह (Party Symbol) सुचवण्याची आजपर्यत म्हणजे सोमवार पर्यत मुदत देण्यात आली होती. या दोन्ही गटाकडून पक्षाची सुचवलेली यादी निवडणुक आयोगा पुढे सादर करण्यात आली आहे. तरी आता कुठल्या गटाला कुठल पक्षचिन्ह आणि पक्षनावं मिळणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. पण शिंदे गटाकडून पुन्हा एकदा ठाकरे गटाची कोंडी करण्यात आली असण्याची चर्चा आहे.
कारण काल फेसबूक लाईव्हमधून (Facebook Live) उध्दव ठाकरे यांनी जाहिर केल्या प्रमाणे ठाकरे गटाला 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे' (Shiv Sena Balasaheb Thackeray), 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) आणि 'शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे' (Shiv Sena Balasaheb Prabodhankarak Thackeray) अशी तीन नावं तर त्रिशूल, उगवता सूर्य आणि मशाल हे तीन पक्ष चिन्ह सुचवण्यात आली आहे. पण आता शिंदे गटाने देखील पक्षाच्या नावासाठी शिवसेना बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebnchi Shiv Sena) आणि शिवसेना बाळासाहेबांची (Shiv Sena Balasahebanchi) असे तीन पर्याय देण्यात आले आहेत. यापैकी शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावाचा प्रस्ताव ठाकरे गटानेदेखील दिला आहे.(हे ही वाचा:- Sanjay Raut: खासदार संजय राऊत यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम पुन्हा वाढला, 17 ऑक्टोबर नंतर ठरणार बेल की जेल)
तसेच शिंदे गटाने देखील पक्षचिन्हासाठी त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा असे तीन पर्याय दिले आहे. म्हणजेच दोन्ही गटाकडून सादर करण्यात आलेल्या तीन नावांपैकी एक नाव तर सादर करण्यात आलेल्या पक्षचिन्हांपैकी दोन पक्ष सारखीच आहे म्हणुन शिंदे गटाकडून पुन्हा एकदा ठाकरे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न आहे अशी चर्चा आहे. पण निवडणुक आयोगाच्या कामाचा आढावा घेता एकाचं पक्ष चिन्हावर दोन्ही गटाने दावा केल्यास ते पक्ष चिन्ह कुणालाही मिळत नाही शक्यता आहे. तर कुठल्या गटाला कुठलं नावं आणि चिन्ह मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.