Pune Records Highest Minimum Temperature at Night: पुणे शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून उष्णतेची लाट (Heat Wave) जाणवत असून, दिवसाच नव्हे तर रात्रीच्या वेळीही तापमान वाढत आहे. शिवाजीनगर येथे शुक्रवारी रात्रीचे किमान तापमान 23 अंश सेल्सिअस होते, जे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) नुसार हंगामातील उच्च होते. तर कोरेगाव पार्कमध्ये रात्रीचे किमान तापमान 27.3 अंश सेल्सिअस होते. रात्रीच्या उच्च तापमानामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे. IMD च्या मते, हे प्रामुख्याने शहरी भागात उष्णतेचा प्रभाव अधिक आहे. सध्या वातावरणातील आर्द्रता वाढल्याने तापमानात वाढ होत आहे.
दरम्यान, शहरातील अनेक भागात दिवसाच्या तापमानात किंचित घट झाली. शिवाजीनगरमध्ये दिवसाचे उच्च तापमान 40.8 अंश सेल्सिअस होते, तर कोरेगाव पार्कमध्ये दिवसाचे उच्चांक 41.8 अंश सेल्सिअस होते (पूर्वी ते 44 अंश सेल्सिअस होते). पाषाणसाठी 40.7 अंश सेल्सिअसच्या तुलनेत हडपसरमध्ये एक दिवस/ कमाल तापमान 40.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. (हेही वाचा -Mumbai Heatwave Alert: सागरी किनारपट्टीसह, मुंबई, ठाणे, नाशिकसह अनेक ठिकाणी उष्णतेची लाट शक्य, हवामान खात्याचा इशारा)
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) गुरुवारी मुंबई तसेच शेजारील ठाणे, पालघर, रायगड आणि महाराष्ट्रातील कोकण विभागातील जिल्ह्यांसाठी पुढील काही दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला. हवामान खात्याने या महिन्यात पहिल्यांदाच असा इशारा दिला आहे, तर मुंबईसाठी या मोसमात चौथ्यांदा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
तथापी, हवामान खात्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. अकोला, वर्धा आणि चंद्रपूरमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. यासोबतच नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. येत्या 72 तासांत यंदाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मुंबई आणि पुण्यात पारा चढतच राहिला, तर राज्यभरात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढण्याची शक्यता आहे.