आम्ही विरोधी पक्षात बसावे अशी जनतेची इच्छा आहे- शरद पवार
Sharad Pawar | (Photo credit : Facebook)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Eletion) निकाल लागून अनेक दिवस उलटले तरीदेखील राज्यात सरकार स्थापन झाले नाही. या निवडणुकीत भाजप- शिवसेना (BJP-ShivSena) पक्षाला बहुमत मिळाले असून मुख्यंमंत्री पदावरुन युतीत वाद पेटला आहे. दरम्यान, भाजप- शिवसेनाचे कार्यकर्ते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली, अशी माहिती समोर आली होती. मात्र, हे साफ खोट असून संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतलीच नाही, असे अजित पवार म्हणाले आहेत. महत्वाचे म्हणजे, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेवून सत्ता स्थापन करु शकते, अशा चर्चांना उधाण आले आहे. यावर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. आम्ही विरोधी पक्षात बसावे अशी जनतेची इच्छा आहे, आणि लोकांच्या इच्छेचा आम्ही मान ठेवू, असे ते म्हणाले आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली होती. परंतु, या विधानसभा निवडणुकीत भाजपला अधिक जागा मिळाल्या असल्या तरी सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना शिवसेना पक्षाची गरज भासत आहे. मात्र, भाजप-शिवसेना यांच्यात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा असणार यावरुन रस्सीखेच सुरु झाली आहे. यातच शिवसेना राष्ट्रवादी पक्षासोबत जाणार अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. यावर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की,आमच्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका निभवावी असे सामान्य जनतेला वाटत आहे, जनतेच्या इच्छेचा आम्ही मान ठेवू, अत्यंत प्रभावीपणे विरोधी पक्षाची भूमिका आम्ही निभावू असे शरद पवार नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले. जनतेने युतीला निवडून दिले आहे, लोकांनी दिलेल्या संधीचा युतीने उपयोग केला पाहिजे, मात्र सध्या दोन्ही पक्षांचा पोरखेळ सुरू आहे, अशी टीकाही पवार यांनी केली. हे देखील वाचा-हे देखील वाचा- भाजप, शिवसेनेशिवाय 9 नोव्हेंबरपूर्वी महाराष्ट्रात सरकार स्थापन करू शकतं! हे आहेत 2 पर्याय

सध्या महाराष्ट्राचे राजकारणात तापले असून मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर कोण विराजमान होणार याकडे सर्व जनेतेचे लक्ष केंद्रीत झाले आहे. तसेच भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन होईल की आणखी काय वेगळच घडेल हे येत्या काही दिवसातच कळेल.