Pune Murder: सुनेच्या हत्येची सुपारी दिलेल्या आरोपींनी सासऱ्याचाच खून; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना
crime I mage only representative purpose (Photo credit: pxhere)

सुनेच्या हत्येची सुपारी देणे सासऱ्याचाच खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुणे (Pune) जिल्ह्यातील खेड (Khed) परिसरात घडली आहे. याप्रकरणी खेड पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच याप्रकरणातील एक आरोपी फरार असून पोलीस त्याच्या शोध घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीने आपल्या मुलाच्या दुसऱ्या पत्नीचा खून करण्यासाठी आरोपींना काही पैसे दिले होते. दरम्यान, मृताने त्याच्या सुनेचा खून कधी करणार? होत नसेल तर पैसे परत करा, असे म्हणत त्यांनी आरोपींकडे तगादा लावला होता. याला वैतागून आरोपींनी सुपारी देणाऱ्या सासऱ्याच खून केला असल्याची माहिती समोर आली आहे.

विनायक भिकाजी पानमंद, असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. विनायक यांचा मुलगा अजितने कुटुंबीयांना न सांगता दुसरे लग्न केले होते. याची माहिती विनायक यांना काही महिन्यांपूर्वी कळाली. यामुळे त्यांच्यात सतत वाद होत असे. या वादाला विनायकची दुसरे लग्न कारणीभूत असल्याचे विनायक यांना वाटू लागले. तसेच मुलाचा पहिला संसार विस्कटल्याचे दुःख त्यांना होते. त्यामुळे त्यांनी मुलाच्या दुसऱ्या पत्नीचा खून करण्याचा कट रचला. यासाठी विनायक यांनी आरोपी अविनाश बबन राठोड, मोहम्मद शहजाद इस्लाम उर्फ छोटू आणि मोहम्मद वसीम जब्बार यांना टप्याटप्याने 1 लाख 34 हजारांची सुपारी दिली. दरम्यान, सुनेचा खून करण्यासाठी आरोपींना वेळ का लागत आहे? होत नसेल, माझे पैसे परत करा असे विनायक यांनी आरोपींकडे तगादा लावला होता. विनायक हे पैसे परत मागत असल्याने आरोपींनी त्यांना खेडमधील वराळे येथे बोलावून त्यांचा गळा दाबून खून केला, अशी माहिती लोकसत्ताने आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- Nashik Murder: खळबळजनक! चोरीचा गुन्हा लपवण्यासाठी एका तरूणाने केली 9 वर्षांच्या मुलाची हत्या; नाशिक येथील घटना

मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून एकजण फरार आहे. अविनाश बबन राठोड आणि मोहम्मद शहजाद इस्लाम उर्फ छोटू अस अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, मोहम्मद वसीम जब्बार हा फरार आहे. या घटनेनंतर खेड परिसरात एकच खळबळ माजली आहे.