Pune Crime News: पुण्यात गर्भपात करून अर्भक फेकला कचऱ्यात, अनैतिक संबंधातून जन्म दिल्याचा संशय
Baby | Representational image (Photo Credits: pxhere)

Pune Crime News: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अनैतिक संबंधातून गर्भपात करून चार महिन्यांचे अर्भक प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून फेकून देण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना पुण्यातील येरवडा परिसरातील पांडू लमाण वस्तीत घडली आहे. धक्कादायक म्हणजे एका अज्ञात व्यक्तीने महिलेचा गर्भपातत करून चार महिन्यांच्या अर्भकाला प्लॅस्टिकच्या बॅगत गुंडाळून फेकून दिले. पोलिसांनी या घटनेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येरवडा येथील पांडू लमाण वस्तीतील शंकर मंगिराच्या कट्यासमोर कचऱ्यात अर्भक सापडले. कचऱ्यात काही तरी संशयास्पद वस्तू दिसल्याने नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले तर मृत अर्भक दिसले. ही घटना पोलिसांत देण्यात आली.पोलीसांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यांनी मृत अर्भक ताब्यात घेतले. हे अर्भक एका प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून होते.

हे अर्भक अनैतिक संबंधातून किंवा मुगली असल्याच्या निदानातून गर्भपात करून फेकून दिल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला.या अर्भकाची उत्तरीय तपासणी करण्यासाठी त्याला ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, हे अर्भक चार महिन्यांचे असल्याचे आढळले आहे. ते जन्माला येणापुर्वीच त्याचा गर्भपात करून फेकून देण्यात आले. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.