अमरावती जिल्हात (Amravati District) उष्माघाताचा (Heatstroke) पहिला बळी गेला आहे. तिवसा (Tivsa) तालुक्यातील डेहनी शिवारात 58 वर्षीय गुराख्याचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. साहेबराव मोहोड, असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गेल्या तीन दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात 45 अंश सेल्सिअस तापमान आहे. उन्हाचा तडाखा बसल्याने या गुराख्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.
या घटनेनंतर मृत गुराख्याचा मृतदेह तिवसा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून देशातील काही भागात उष्णेच्या लाटेमुळे रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (हेही वाचा - Maharashtra Monsoon 2020 IMD Prediction: मुंबई मध्ये 11 जूनच्या आसपास मान्सून दाखल होण्याची शक्यता तर कोकणासह पश्चिम किनारपट्टीवर 2-3 जूनपर्यंत मान्सूनपूर्व सरी बरसतील; हवामान खात्याचा अंदाज)
#अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील डेहनी शिवारात ५८ वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाला. साहेबराव मोहोड असे मृताचे नाव आहे. तीन दिवसांपासून जिल्ह्यात ४५ अंश सेल्सिअस तापमान आहे पारा चढत असल्याने उन्हाचा तडाखा बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. #Maharashtra #heatwave #summer
— AIR News Mumbai, घरीच रहा, सुरक्षित रहा (@airnews_mumbai) May 28, 2020
दरम्यान, मागील दोन दिवसांपासून उन्हाचा पारा 47 डिग्रीच्या वर गेला आहे. उन्हामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. साहेबराव मोहोड हे नेहमीप्रमाणे आपली जनावरे डेहनी शेतशिवारात चराईसाठी घेऊन गेले होते. परंतु, उन्हाचा पारा जास्त असल्याने त्यांचा मृत्यू झाला. एका झाडाखाली त्यांचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती मिळताचं पोलीस निरीक्षक रिता उईके यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच मृतदेह जवळच्या जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.