Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका (Maharashtra Assembly Election 2024) 26 नोव्हेंबरपूर्वी होणार आहेत. सध्या सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. दरम्यान, आता महायुतीच्या उमेदवारांच्या यादीसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. लवकरच महाराष्ट्रातील महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी (First List Of Mahayuti Alliance Candidates) जाहीर करण्यात येणार आहे. प्राप्त माहितीनुसार, महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी नवरात्री (Navratri 2024) च्या मुहूर्तावर जाहीर करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. परंतु, या यादीत केवळ भाजपचेच उमेदवार असतील की, शिंदे गट शिवसेना किंवा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे (अजित गट) उमेदवार असतील? याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
भाजप 40-50 उमेदवारांची नावे जाहीर करण्याची शक्यता -
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्ष नवरात्रीच्या काळात 40 ते 50 उमेदवारांची नावे जाहीर करणार आहे. 80 टक्के जागांच्या वाटपावर महायुतीचे एकमत झाले आहे. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात 125 ते 140 जागा लढवणार आहे. (हेही वाचा -Ajit Pawar on Mahayuti Seat Allocation Formula: अजित पवारांचे जागावाटपावर मोठे भाष्य; मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे विधान)
जागा वाटपासाठी महाविकास आघाडीची बैठक -
दरम्यान, दुसरीकडे काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते नाना पटोले यांनी रविवारी सांगितले की, महाविकास आघाडी (एमव्हीए) विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची चर्चा पुढील आठवड्याच्या सुरुवातीला पूर्ण करेल. जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी एमव्हीएचे नेते 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला बैठक घेणार आहेत. (हेही वाचा - Ajit Pawar NCP: महायुती पेचात, भाजपचे कट्टर हिंदुत्त्व आणि अजित पवार यांचे मुस्लिम कार्ड; शिंदे सेनेचे काय?)
तथापी, आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी येत्या 8 ते 10 दिवसांत जागावाटपाची वाटाघाटी पूर्ण करेल, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. 288 सदस्यांच्या राज्य विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबरच्या मध्यात होण्याची शक्यता असल्याचंही पवार यांनी बारामतीत त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले.