मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग (Mumbai Pune Expressway) आज (बुधवार) 2 तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा निर्णय घेतला असून उद्या मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक दुपारी 12 ते 2 दरम्यान पूर्णपणे बंद राहणार आहे. ओव्हरग्रेड गँन्ट्री बसवण्यासाठी हा महामार्ग बंद ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ब्लॉकच्या कालावधीत सर्वच प्रकारची अवजड व मालवाहतूक करणार वाहने खालापूर व कुसगाव टोलनाक्याच्या अलीकडे थांबविण्यात येणार आहेत. तसेच हलकी चालचारी व इतर प्रवासी वाहने कुसगाव टोलनाका येथून जुन्या मुंबई-पुणे महामार्गाद्वारे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गेल्या महिन्यातही दोन तासांसाठी ब्लॉक घेण्यात आला होता. या मार्गावर आतापर्यंत अनेक प्रवाशांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. या महामार्गावर अनेकदा दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. तुम्ही आज मुंबई-पुणे महामार्गावरून वाहतूक करणार असाल तर या ब्लॉगच्या अगोदर किंवा नंतर प्रवास करा.
15 सप्टेंबर रोजी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर व्होल्वो बसच्या भीषण अपघातात संचेती हॉस्पिटलचे डॉ. केतन खुर्जेकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. डॉ. खुर्जेकर हे संचेती रुग्णालयाच्या अस्थीरोग विभागाचे प्रमुख होते. तसेच आतार्यंत त्यांनी मणक्याच्या 3500 शस्त्रक्रिया केल्या आहेत. 'एमएस ऑर्थोपेडिक्स'मध्ये त्यांना सुवर्णपदक सुद्धा प्राप्त आहे. ज्या दिवशी खुर्जेकर यांचा मृत्यू झाला त्यादिवशी त्यांचा वाढदिवस होता.