Family of 'suspected COVID-19' patient created ruckus at Cooper hospital (Photo Credits: ANI/Screenshot)

मुंबई (Mumbai) येथील कूपर रुग्णालयात (Cooper Hospital) उपचारासाठी दाखल झालेल्या रूग्णाच्या मृत्यूमुळे, संतप्त नातेवाईकांनी, रुग्णालयात गडबड, गोंधळ घातल्याची घटना 19 जुलै रोजी घडली होती. या रुग्णाला इंजेक्शन दिले गेले आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. यासह त्यांनी बीएमसी (BMC) अधिकारी आणि रुग्णालय प्रशासनावरही गंभीर आरोप केले होते. आता बीएमसीने याबाबत आपले स्पष्टीकरण दिले आहे. बीएमसीने सांगितले आहे की, आयसीएमआर मार्गदर्शक तत्त्वांनुसार ठरविलेल्या उपचार पद्धतीनुसारच या रुग्णावर उपचार झाले होते.

एएनआय या वृत्त संस्थेने याबाबत माहिती दिली आहे. बीएमसीने सांगितले आहे, ‘या रुग्णाला जेव्हा रुग्णालयात आणले गेले तेव्हा त्याच्या तोंडातून रक्तस्त्राव होत होता व त्यानंतर त्याला तातडीने प्राथमिक उपचार देण्यात आले. रूग्णाला त्वरित दाखल करून घेतले व आवश्यक उपचार प्रक्रिया सुरु झाली. या रुग्णामध्ये न्यूमोनियाची लक्षणे दिसली होती. न्यूमोनिया आणि कोविडची लक्षणे समान आहेत. हॉस्पिटल मॅनेजमेंटने उपचारांच्या बाबतीत आयसीएमआर मार्गदर्शक तत्त्वांनुसार ठरविलेल्या गोष्टी केल्या. त्यामुळे हे पूर्णतः खोटे आहे की, रुग्णालयाकडून उपचाराबाबत काही निष्काळजीपणा झाला होता.’ (हेही वाचा: मुंबईमध्ये आज 995 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 1,03,262 वर)

एएनआय ट्वीट -

बीएमसीने पुढे सांगितले आहे, ‘रुग्णालय आणि मनपा अधिकाऱ्यांवर झालेले आरोप हे अतिशय दुर्दैवी आहेत. या रुग्णाच्या मृत्यूचे कारण न्यूमोनिया आणि संशयित कोविड म्हणून नोंदवले गेले. आयसीएमआर प्रोटोकॉलनुसार त्याचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. परंतु कुटुंबीय संतप्त झाले.’

सध्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये घातलेल्या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दिसून येत आहे की, हॉस्पिटलमध्ये संतप्त नातेवाईक अर्वाच्य भाषेत बोलत भांडण करत आहेत,