Coronavirus (Photo Credits: PTI)

महाराष्ट्राची राजधानी मुंबई (Mumbai) मध्ये आज 995 कोरोना विषाणू (Coronavirus) रुग्णांची व 62 मृत्यूंची नोंद झाली आहे. यासह मुंबईमधील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 1,03,262 वर पोहोचली आहे. आज शहरामध्ये एकूण 897 कोरोना विषाणू संशयित रुग्णांना भरती करण्यात आले. आज शहरामध्ये 905 कोरोन रुग्ण बरे झाले आहेत, अशाप्रकारे आतापर्यंत एकूण 73,555 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत शहरामध्ये 5,814 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरामध्ये 23,893 सक्रीय रुग्ण आहेत. बीएमसीने याबाबत माहिती दिली आहे.

मुंबईमध्ये आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 46 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 44 रुग्ण पुरुष व 18 रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 2 जणांचे वय 40 वर्षा खाली होते, 39 जणांचे वय 60 वर्षा वर होते, तर उर्वरित 21 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. सध्या मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 71 टक्के आहे. 15 जुलै ते 20 जुलै पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 1.18 टक्के राहिला आहे. 20 जुलै 2020 पर्यंत झालेल्या कोविड च्या एकूण चाचण्या 4,43,083 आहेत. मुंबईतील सध्याच्या रुग्ण दुप्पटीचा दर 59 दिवस झाला आहे.

(हेही वाचा: मुंबई येथील धारावीची कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू; परिसरात आता केवळ 151 ऍक्टिव्ह रुग्ण)

एएनआय ट्वीट -

शहरातील विविध कोरोना सुविधा केंद्रातील क्षमतेबद्दल बोलायचे झाले तर, 10 जुलै पर्यंत सुविधा केंद्रांमध्ये बेड्सची क्षमता 16,811 आहे, सध्या शहरात आयसीयु बेड्स/ व्हेंटीलेटर बेड्सची संख्या 1748/1054 आहे व ऑक्सिजन बेड्सची संख्या 11,288 आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत बोलायचे झाले तर, सध्या सक्रिय कंटेनमेंट झोन (झोपडपट्ट्या आणि चाळी) ची संख्या 654 आहे, तर सक्रिय सीलबंद इमारती 6087 आहेत. दरम्यान, आज महाराष्ट्रात 8,369 कोरोन विषाणू रुग्णांची व 246 मृत्यूंची नोंद झाली आहे. यासह राज्यातील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 3,27,031 झाली आहे.