COVID19 Vaccine: कोरोना प्रतिबंधात्मक लस डिसेंबरमध्ये बाजारात येणार; पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटचा दावा
Coronavirus Vaccine Representational Image (Photo Credits: ANI)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगावर हाहाकार माजवला आहे. संपूर्ण जगात दिवसेंदिवस कोरोनाचे संकट आणखी गडद होत चालले आहे. परिणामी, 170 हून अधिक देशांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यासंदर्भात जागतिक पातळीवर मोठे संशोधन सुरु आहे. भारतासह जगातील अनेक संस्था यासाठी अहोरात्र झटत आहे. यातच कोरोना प्रतिबंधात्मक लस डिसेंबर महिन्यात बाजारात दाखल होणार असल्याची माहिती पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटचे (Serum Institute) कार्यकारी संचालक डॉक्टर संजीव ढेरे यांनी दिली आहे. लस विकसित करण्याचा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. तसेच चाचणी सुरक्षित असून आवश्यक परिणामकारक आहे.

ऑक्सफर्डबरोबर पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटचे ही योगदान आहे. ऑक्सफर्ड आतापर्यंत केलेल्या चाचण्यांना मोठे यश आले आहे. ऑगस्ट महिन्यात माणसांवर या लसीची ट्रायल होईल. साधारण पंधराशे ते 2 ते 3 हजार लोकांवर ही ट्रायल करण्यता येणार आहे. भारतात माणसांवरील चाचण्यांचे निकाल ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येतील. याचदरम्यान यूकेमधील चाचण्यांचे रिझल्ट ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येतील. आमची उत्पादने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात तयार होईल. म्हणजेच येत्या डिसेंबरमध्ये ही लस उपलब्ध होईल, असा दावा राजीव ढेरे यांनी केला आहे. तसेच एकीकडे चाचण्या सुरु असतानाच सिरम इन्स्टिट्यूटमध्ये लसीचे उत्पादनही सुरु असल्याचे राजीव ढेरे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Oxford COVID-19 Vaccine Trial Results: ऑक्सफोर्डच्या कोरोना व्हायरस लसीच्या चाचण्यांनी दाखवले सकारात्मक परिणाम; Safe, Well-Tolerated आणि Immunogenic असल्याचा दावा

चीनमधील वुहान शहरात जन्मलेल्या कोरोना विषाणुने संपूर्ण जगभरात थैमान घातला आहे. जगभरात आतापर्यंत 1 कोटी 511 लाख 51 हजार 702 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 6 लाख 21 हजार 121 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 91 लाख 62 हजार 840 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अमेरिका अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर ब्राझील तर, भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत आतापर्यंत 40 लाख 30 हजार 936 लोकांना कोरोनाची लागण झाली असून 1 लाख 44 लाख 986 जणांचा मृत्यू झाला आहे.