Sangmner Accident: देव तारी त्याला कोण मारी! माहुली घाटात कार 70 फूट दरीत कोसळली, पण तिघेही बचावले
Accident Representational image (PC - PTI)

अहमदनगर (Ahmadnagar) जिल्ह्यातील संगमनेर (Sangmner) तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील (Pune-Nashik National Highway) माहुली घाटात (Mahuli Ghat) 70 फूट खोल दरीत कार कोसळल्याची घटना (Car Accident) समोर आली आहे. आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली होती. महत्वाचे म्हणजे, या अपघातातील कारने पाच- सहा पलट्या खाऊनही केवळ दैव बलवत्तर असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या कारमधील तिघेही तरूण सुखरूप असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात येथील 3 तरूण भीमाशंकरला जात होती. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाने जात असताना त्यांची कार माहुली घाटात 70 फूट दरीत कोसळली. या अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. ज्या ठिकाणाहून कार पलट्या खात गेली त्याठिकाणी मोठ मोठे दगडही आहेत. केवळ नशीब चांगले असल्याने कारमधील तिघेही तरूण अगदी थोडक्यात बचावले आहे. या घटनेची माहिती होताच स्थानिक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. हे देखील वाचा- 'माझा कोकण संपन्न करण्यासाठी जे करता येईल ते ते करण्याचे वचन भराडी देवीच्या साक्षीने देतो'- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ट्वीट-

याआधी माहुली घाटात अनेक अपघात झाले आहेत. तर, रस्ता अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच घाटात काही महिन्यांपूर्वी अशाच पद्धतीने एक कार पलटी झाली होती. त्यानंतर मालवाहू ट्रकदेखील पलटी झाल्याची माहिती मिळत आहे.