Nagpur Police | Photo Credits: Twitter/ ANI

कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात हाहाकार माजावला आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. चीन मध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, देशावर कोरोनाचे संकट वावरत असताना अनेकजण अशांतता निर्माण करण्याच्या प्रयत्न करत आहेत. यातच पालघर (Palghar) जिल्ह्यात व्हॉट्सऍपच्या (Whatsapp) माध्यमातून दोन धार्मिक गटात तेढ निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून व्हॉट्सऍप ग्रुपवर पोस्ट प्रसारीत केल्याबाबत ऍडमीनसह एकाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून कोणीही चुकीच्या माहितीचा प्रसार करू नये, असे आवाहन पोलिसांकडून वारंवार करण्यात येत आहेत. मात्र, काहीलोक पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करत असल्याचे समोर आले आहे. तसेच या लोकांवर कारवाई देखील करण्यात आली आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खोट्या माहितीचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत असल्याच्या अनेक बातम्या आपल्या कानावर पडत आहेत. यातच पालघर जिल्ह्यातील एका घटनेने सर्वांचे लक्ष केंद्रीत करून घेतले आहे. शनिवारी पालघर जिल्ह्यातील एका व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर दोन धार्मिक गटात वाद निर्माण करण्याच्या उद्देशाने एका इसमाने पोस्ट टाकली होती. यामुळे सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता निर्माण होती. स्थानिक पोलिसांनी याबाबत ट्विटरवर तक्रार प्राप्त झाली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित ग्रुप ऍडमीनसह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीची माहिती घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे देखील वाचा- कोणत्याही परिस्थितीत विद्यापीठांच्या परीक्षा घेतल्या जातील; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

पालघर पोलिसांचे ट्वीट-

सोशल मीडियावर चुकीचे अथवा कोणत्याही धर्माच्या, समाजाच्या भावना दुखावतील तसेच दोन धर्मामध्ये, समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल अश्याप्रकारचे संदेश टाकू नये. अशा प्रकारचे कृत्य कोणी केल्यास अथवा त्यास प्रोत्साहन दिल्यास सदर व्यक्तींच्याविरोधात योग्य ती कारवाई करण्याय येणार आहे. तसेच पालघर जिल्ह्यातील सर्व ग्रुप ऍडमीन यांनी आपल्या ग्रुपची सेंटीग सेंन्ड मॅसेज ऑनली ग्रुप ऍडमीन अशी करावी. प्रशासनाने दिलेल्या सुचनाचे नागरिकांनी तंतोतंत पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालघर जिल्ह्यातील पोलिस अधिक्षक यांनी नागिरिकांना केले आहे.