Lockdown: लॉकडाऊन काळात गरज नसताना बाहेर फिरणाऱ्या वाहनचालकांवर रायगड पोलिसांकडून कारवाई; एक कोटी पेक्षा अधिक दंडाची रक्कम वसूल
Raigad Police (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रात (Maharashtra) दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. तसेच लॉकडाउनच्या (Lockdown) काळात प्रत्येक नागरिकांनी सरकारच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. मात्र, काही ठिकाणी नागरिक लॉकडाउनच्या नियमाचे उल्लंघन आहेत. यामुळे अशा नागरिकांच्या विरोधात रायगड पोलिसांकडून (Raigad Police) कायदेशीर कारवाई केली जात आहे. दरम्यान, रायगड पोलिसांनी वसूल केलेल्या दंडाची रक्कम एक कोटी पेक्षा अधिक आहे. कोरोनाविषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरीच राहावे, यासाठी रायगड पोलिस सक्त कारवाई करताना दिसत आहेत.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घरातच बसून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहेत. मात्र, काही नागरिक अत्यावश्यक साहित्यांची खरेदी करण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. यामुळे सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे उल्लंघन होत आहे. एवढेच नव्हेतर, काही नागरिक गरज नसताना गैरजबाबदारीपणाने बाहेर फिरत आहेत. यामुळे अशा वाहनचालकांविरोधात रायगड पोलीसांकडून कठोर पाऊल उचलली जात आहे. हे देखील वाचा- Coronavirus: सेंट जॉर्ज, जीटी, नायर रुग्णालयाला देवेंद्र फडणवीस यांची भेट; कोरोनाची सद्यस्थिती आणि उपाययोजनांबाबत डॉक्टर, अधिष्ठात्यांशी केली चर्चा

ट्वीट-

महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या कालावधीत कलम 188 नुसार 95 हजार 678 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. यातील 18 हजार 722 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तसेच विविध गुन्ह्यांसाठी 3 कोटी 51 लाख 38 हजार 694 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.