
ठाणे (Thane News) येथील मानपाडा परिसरात एका 20 वर्षीय महिलेने तिच्या राहत्या इमारतीच्या 11 व्या मजल्यावरून खाली उडील घेत आत्महत्या (Thane Case) केल्याचे वृत्त आहे. प्राप्त माहितीनुसार, सदर महिलेस मोबाईल फोन वापरण्याचे व्यसन (Mobile Phone Addiction) होते. त्यामुळे ती सतत फोनला चिकटून असे. तिच्या दीर्घकाळ मोबाईल फोन वापरण्यावरुनच कुटुंबातील सदस्यासोबत झालेल्या जोरदार वादातून तिने हे धक्कादायक कृत्य केले आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. त्यासोबतच नागरिकांमध्ये वाढत असलेले मोबाईल व्यसन याबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे.
फोनवर बोलण्यास मज्जाव केल्याने टोकाचे पाऊल
मानपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या 11 व्या मजल्यावरुन उडी मारुन सदर महिलेने आत्महत्या केल्याची कथीत घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. मृत महिलेचे नाव समिक्षा नारायण वड्डी असे आहे. ती तिच्या मोबाईल फोनवर बराच वेळ बोलत असताना तिच्या काकांनी हस्तक्षेप केला आणि तिला थांबण्यास सांगितले आणि तिचा फोन जप्त केला. या भांडणानंतर, समिक्षा त्यांच्या अपार्टमेंटच्या हॉलमध्ये धावत गेली आणि गॅलरीतून उडी मारली. तिला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
मानपाडा पोलीस दप्तरी घटनेची नोंद
मानपाडा पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अपघाती मृत्यूचा अहवाल (एडीआर) दाखल करण्यात आला आहे. तिने इतके टोकाचे पाऊल का उचलले हे समजून घेण्यासाठी आम्ही सर्व शक्य दृष्टिकोनातून तपास करत आहोत. मोबाइल फोनच्या वादापलीकडे मानसिक आरोग्याच्या समस्या किंवा इतर काही कारणे आहेत का हे निश्चित करण्यासाठी पोलिस घटनांच्या क्रमाची देखील चौकशी करत आहेत.
वाचकांसाठी सल्ला: जर तुम्ही स्वत: किंवा तुमच्या परिचयातील कोणीही व्यक्ती मानसिक ताण, मानसिक आरोग्यविषयक समस्या किंवा इतर कोणत्या अन्याय, अत्याचाराच्या घटनांमुळे आत्महत्येच्या विचारांनी ग्रस्त असाल, तर कृपया व्यावसायिक मदत घ्या किंवा मानसिक आरोग्य हेल्पलाइनशी संपर्क साधा. विनामुल्य सेवा आणि माहितीसाठी खालील संपर्क क्रमांकावर संपर्क साधा. हे सर्व क्रमांक टोल फ्री आहेत. त्यावरुन मागितलेल्या मदत, मार्गदर्शनासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्य हेल्पलाइन क्रमांक:
टेली मानस (आरोग्य मंत्रालय): 14416 किंवा 1800 891 4416; निमहंस: + ९१ + 91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400; पीक माइंड: 080-456 87786; वांद्रेवाला फाउंडेशन: – 9999 666 555; अर्पिता आत्महत्या प्रतिबंध हेल्पलाइन: 080-23655557; आयकॉल: 022-25521111 आणि 9152987821 आणि 9152987821; सीओओजे मेंटल हेल्थ फाउंडेशन (सीओओजे): 0832-2252525.