Thane Water Cut: ठाण्यात (Thane) पाणीपुरवठ्या संदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. ठाण्यात शुक्रवारी १ डिसेंबर रोजी पाणीपुरवठा विषयक दुरुस्ती कामामुळे ठाण्यातील काही भागातील परिसरात पाणीपुरवठा बंद (Water Cut) राहणार आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. उद्या ठाण्यातील काटई नाका येथे महाराष्ट्र औद्यगिक विकास महामंडळामार्फत (MIDC) जलवाहिनीची दुरुस्ती केली जाणार आहे. या संदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत बारवी गुरुत्व वाहिनीवर कटाई नाका येथे तातडीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात शुक्रवार, ०१ डिसेंबर, २०२३ रोजी दु. १२.०० ते रा. १२.०० असे १२ तास एमआयडीसीकडून येणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
— Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका
(@TMCaTweetAway) November 29, 2023
एमआयडीसी शुक्रवारी काटई नाका येथे पाणी पुरवठा जलवाहिनी दुरुस्ती केली जाणार आहे. तरी उद्या दुपारी 12 ते रात्री 12 या काळात एमआयडीसीकडून पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तातडीचे काम हाती घेतल्यामुळे 12 तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.
ठाणे महापालिक क्षेत्रातील दिवा, मुंब्रा, कळवा, वागळे इस्टेट येथील रुपादेवी पाडा, किसननगर, नेहरूनगर आणि घोडबंदर येथील कोलशेत परिसरात एमआयडीसीकडून पाणी पुरवठा बंद राहणार आहे. दुरुस्तीचे काम पुर्ण होताच पाणी पुरवठा सेवा सुरळीत होईल अशी माहिती पालिकेने दिली आहे. ठाणे महानगर पालिकेने परिसरातील नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. शुक्रवारी ठाण्यातील नागरिकांची गैरसोय होणार आहे..