ठाणेकरांना (Thane) यंदाच्या विकेंडला पाणी साठवण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे. दुरूस्तीच्या कामासाठी ठाण्यातील काही ठिकाणी 24 आणि 25 मार्च दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा २४ तासासाठी पूर्णपणे बंद राहील. त्यानंतरही 1-2 दिवस पाणीपुरवठा कमी दाबाने होईल असं सांगण्यात आले आहे.
ठाण्यात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा मार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत नवीन टाकलेल्या बारवी गुरत्व वाहिन्या कार्यान्वित करण्याचे तातडीचे काम हाती घेतल्यामुळे हा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. 24 मार्च दुपारी 12 वाजल्यापासून पुढील 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ठाणे महानगरपालिके अंतर्गत दिवा आणि कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागामध्ये, मुंब्रा प्रभाग समिती मधील वाय जंक्शन ते मुंब्रा फायर ब्रिगेड परिसरापर्यंत व वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. २.नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा २४ तासासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.
पहा ट्वीट
*शुक्रवारी ठाण्यातील काही भागातील पाणीपुरवठा बंद* (१/७)
— Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका (@TMCaTweetAway) March 22, 2023
दरम्यान पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून योग्य प्रमाणात साठा आणि उपलब्ध पाण्याचा योग्य रीतीने वापर करण्याचं देखील ठाणेकरांना आवाहन करण्यात आलं आहे.