Thane Vaccination: ठाणे महापालिका लसीकरण केंद्राचा अजब प्रकार, महिलेला दिले एकाच वेळी लसीचे तीन डोस
Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: Pixabay.com)nation)

Thane Vaccination:  राज्यात लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात राबवली जात असल्याचे वारंवार सांगितले जाते. परंतु अद्याप ही काही लसीकरण केंद्रावर पुरेश्या लसींचा साठा उपलब्ध होत नाही आहे. ऐवढेच नव्हे तर महापालिकेकडून जरी मोफत लस दिली जात असली तरीही डोस उपलब्ध नसल्याने नागरिकांना परत घरी फिरावे लागत आहे. अशातच आता ठाणे महापालिकेच्या लसीकरण केंद्गावरील एक अजब प्रकार समोर आला आहे. त्यानुसार एकाच महिलेला लसीचे तीन डोस दिल्याचे सांगण्यात येत आहे. हा प्रकार 25 जून रोजी घडला आहे.

ज्या महिलेला लसींचे तीन डोस दिले तिची प्रकृती स्थिर आहे. पण डॉक्टरांचा निष्काळजीपणा यामधून स्पष्टपणे दिसून येतो. या प्रकरणी संबंधित लोकांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. याबद्दल समिती नेमली असून त्याची चौकशी करत असल्याचे महापालिकेने दिले आहे. (लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही विधानभवनात प्रवेशाकरिता आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक)

तर लसीकरण केंद्रावर महिलेला डोस दिल्यानंतर ती घाबरली आणि घरी आली. तिने घरातल्यांना तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा स्थानिक नगरसेविकांना याबद्दल सांगण्यात आले. नगरसेविकांनी संबंधित अधिकाऱ्याला या संदर्भात विचारले असता त्याने दुर्लक्ष करत नीट उत्तर सुद्धा दिले नाही. यावर भाजपने संताप व्यक्त केला असून या प्रकरणी कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या घटनेला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप ही विरोधकांनी केला आहे.(Delta and Delta Plus Variants FAQs: डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएन्टस: वारंवार विचारले जाणारे प्रश्न आण त्यांची उत्तरे)

दरम्यान, या बद्दल महापालिकेच्या अधिकाऱ्याला विचारले असता त्यांनी असा प्रकार घडला नसल्याचे उत्तर दिले. तसेच या प्रकरणी चौकशी करण्यासाठी एक समिती नेमून कारवाई केली जाईल असे महापौरांनी म्हटले आहे.