कल्याण येथे अंधश्रद्धेमुळे परिवारातील दोन जणांचा बळी, तांत्रिकासह आरोपींना पोलिसांकडून अटक
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

कल्याण (Kalyan) येथे अंधश्रद्धेमुळे (Superstition) एकाच परिवारातील दोन जणांचा बळी गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये 50 वर्षीय व्यक्ती आणि त्याची 72 वर्षाची आई यांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना कल्याण मधील अटली गावात घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. पंढरीनाथ तरे (50) आणि चंदुबाई तरे (72) अशी मृतांची नावे आहेत.(औरंगाबाद मध्ये संपत्तीच्या वादातून भावाची हत्या करणाऱ्या 57 वर्षीय दोषीला अटक)

पोलिसांनी या प्रकरणी अधिक माहिती देत असे म्हटले आहे की, पंढरीनाथ यांची भाची कविता तरे आणि भाचा विनायक तरे, 17 वर्षाचा मुलगा आणि 35 वर्षीय तांत्रिक सुरेंद्र पाटील यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी तांत्रिक पाटील याने असे म्हटले की, कविताकडे अलौकिक शक्ती आहे. तर त्याचे काका पंढरीनाथ आणि आजी चंदुबाई यांच्या शरिरात राक्षसी शक्ती असल्याचे तांत्रिकाने म्हटले होते.(पुणे: Quarantine Center मध्ये सुरक्षारक्षाकडून महिलेशी अश्लील वर्तन, आरोपीला अटक) 

पाटील याने या तिघांना सांगितल्याप्रमाणे शनिवारी रात्री त्यांनी चंदुबाई आणि पंढरीनाथ यांच्यावर हळद टाकून त्यांच्यामधील राक्षसी शक्ती बाहेर यावी यासाठी त्यांना बांबूने मारहाण करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी पुढे म्हटले आहे. या प्रकरणी तिघांवर कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

यापूर्वी ओडिशाच्या  मधील नरसिंहपूर येथे एका मंदिराच्या पुजार्‍यानेकोरोना विषाणूचे संकट टळावे म्हणून, एका व्यक्तीला ठार मारून देवीला नरबळी दिल्याची घटना समोर आली होती. नरसिंहपूर बंधहुडा गावात बुधवारी रात्री एका व्यक्तीचा मृतदेह ब्राह्मणी देवी मंदिर परिसरात सापडला. स्थानिक पोलिसांनी या हत्येमध्ये वापरली गेलेली शस्त्रे जप्त केली होती.