Crime (PC- File Image)

Thane Crime News: मुबंई १७ वर्षीय मुलाच्या हत्यांकाडाची माहिती मिळताच, शहरात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान ठाण्यात देखील शिवसेना शिंदे गटाच्या उपशाखा प्रमुख असलेल्या मुलाची हत्या करण्यात आली. या हत्येचं रहस्य आता उलगडलं आहे. पैशाच्या व्यवहारातून ही हत्या करण्यात आली आहे. अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. अक्षय ठुबे असं या हत्तेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेअंतर्गत पोलीसांनी तीन संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. साम टीव्ही या वृत्त वाहिनीने या घटनेची माहिती दिली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,२९ ऑगस्टपासून अक्षय ठुबे हा बेपत्ता होता. अक्षयला धारदार शस्त्राने मारल्याचे समजले आहे. सोबत त्याच्या मृतदेहाची विल्लेवाट लावण्यासाठी जाळण्याचा देखील प्रयत्न केला आहे. पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच, तपसाणी सुरु केली. बुधवारी पोलिसांना अक्षयचा मृतदेह कोकणीपाडा परिसरातील जंगलात आळून आला. चितळसर पोलिसांनी मृतदेहाची नोंद घेतली.

पोलीसांना मृतदेह सापडताच कंबर कसून चौकशी सुरु केली. तर या घटनेअंतर्गत पोलीसांना ३ जणांवर संशय आला. ३ जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या घटनेमुळे ठाणे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मंगळवार पासून अक्षय घरी नव्हता त्यामुळे कुटूंबातील सदस्यांनी पोलीसांत तक्रार केली. त्यामुळे या घटनेची उघडकीस झाली.  पैशाच्या व्यवहारामुळे त्यांनी रागाच्याभरात खून केल्याची कबुली केली.