Thane Municipal Budget 2022-23: ठाणे महापालिकेकडून 3,299 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प जाहीर
Thane Municipal (Photo Credits-Facebook)

Thane Muncipal Budget 2022-23: ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी गुरुवारी 3,299 कोटी रुपयांचा पुढील आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प 2022-23 सादर केला आहे. त्यामध्ये करात वाढ करण्यात येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, जीएसटीमधून 1,239.39 कोटी रुपये, कर आणि फी मधून 717.77 कोटी, शहराच्या विकासासाठी 500.42 कोटी, पाणी बिलासाठी 172.54 कोटी आणि अन्य विभागांसाठी 104.80 कोटी रुपये हे फायर सर्विस टॅक्ससाठी असणार आहेत.

मीडियासमोर अर्थसंकल्प सादर करताना आयुक्तांनी असे म्हटले की, गेल्या वर्षात कोविड19 संबंधितच्या कामांसाठी 230 कोटी रुपये खर्च करण्यात आले. तर आता त्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतुद जाहीर करण्यात आली आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापनासाठी 715.89 कोटी, शिक्षण विभागाच्या सुविधेसाठी 324.44 कोटी, पाणी पुरवठ्यासाठी 322.29 कोटी, आरोग्य सुविधेसाठी 317.20 कोटी, रस्ते बांधकामासाठी 285.87 कोटी, गरिबांसाठी 235.69 कोटी, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी 196.83 कोटी  आणि वाहतूकीसाठी 151.10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.(मुंबई महापालिकेवर नेमण्यात येणार प्रशासक; 7 मार्चनंतर निर्णय- Minister Nawab Malik)

या व्यतिरिक्त 5 कोटी रुपयांची तरतूद ही फिल्म इंस्टिट्युटसाठी, 20 कोटी तलावांच्या सुशोभनासाठी, 20 कोटी रुपयांची तरतूद ही पार्किंग सुविधेसह अन्य प्रकल्पांसाठी जाहीर करण्यात आल्याचे शर्मा यांनी म्हटले आहे. तसेच महापालिकेने अर्थसंकल्पात 149 कोटी रुपयांची तरतूद ही शहरातील क्लस्टर योजनेसाठी, 10 कोटी महापालिकांच्या शाळांसाठी , 10 कोटी हे महापालिकेच्या कळवा येथील रुग्णालयासह राजीव गांधी मेडिकल कॉलेजसाठी तरतूद करण्यात आले आहेत.