कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा जोमाने कामाला लागल्या आहेत. नागरिकांना सोशल मिडिया आणि जमेल त्या पद्धतीने आवाहन करत कोरोना संदर्भात आवश्यक ती खबरदारी घेण्याचे सांगण्यात येत आहे. यात राजकीय मंडळी, सिने स्टार्सने देखील पुढाकार घेतला आहे. ज्या ज्या मार्गाने कोरोनाचा फैलाव होतो त्या त्या मार्गाने जाणे टाळावे असे सांगण्यात येत आहे. मग ते गर्दी करणे असो, वर्दळीच्या ठिकाणी जाणे, मास्क घालणे असो किंवा एकमेकांना स्पर्श करणे असो. नानाविध पद्धतीने कोरोनाविरुद्ध लढा सुरु आहे. अशातच ठाणे महापौर नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन केले आहे.
कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी नरेश म्हस्के यांनी सामाजिक संदेश देणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ते नागरिकांना हस्तांदोलन न करण्याचे आवाहन करत आहे.
पाहा व्हिडिओ:
#प्रिय ठाणेकर...!#CoronavirusOutbreak #CoronaVirusUpdates #HighRiskCovid19 #Corona #GoCoronaGo pic.twitter.com/WpYSfl0ck3
— Naresh Mhaske (@nareshmhaske) March 16, 2020
हेदेखील वाचा- Coronavirus: कोरोना व्हायरस हटवण्यासाठी रामदास आठवले यांनी अवलंबला 'हा' अनोखा उपाय (Watch Video)
ठाणे महापौर नरेश म्हस्के यांनी व्हिडिओ शेअर नमस्कार करा आणि कोरोनाला दूर ठेवा असे म्हटले आहे. हा खूप महत्त्वाचा संदेश असून नागरिकांना एकमेकांशी ठराविक अंतर ठेवून संभाषण करा असे यात सांगण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी बिग बी अमिताभ बच्चन यांनी एका कवितेच्या माध्यमातून करोनाविषयी जनजागृती निर्माण केली होती. हा व्हिडिओ त्यांनी त्यांच्या सोशल अकाउंटवरुन शेअर केला होता.