ठाणे येथील नागरी आरोग्य विभाग एकाच आठवड्यात दुसऱ्या वेळेस सील करण्यात आले आहे. कारण महापालिकेच्या आरोग्य विभागातील 5 कर्मचाऱ्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या कर्मचाऱ्यांचे कोरोनाची रिपोर्ट्स बुधवारी रात्री आल्यानंतर गुरुवारी विभाग गुरुवारी सील करण्यात आले आहे. ज्या पाच कर्मचाऱ्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य जणांना होम क्वारंटाइनचा सल्ला देण्यात आला आहे. या अन्य जणांची सुद्धा लवकरच कोरोनाची चाचणी करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाचा मजला तात्पुरता सील करण्यात आला असून सॅनिटायझेन केल्यानंतर पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात एका महिलेचा क्लर्कची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे ही सांगण्यात आले आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असल्याचे राज्य सरकार कडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. तर राज्यातील मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. याच दरम्यान ठाणे येथे सुद्धा कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असून तो आता 5268 वर पोहचला आहे. तसेच 81 जणांचा बळी गेला असून 1172 जणांची प्रकृती सुधारल्याची माहिती देण्यात आली आहे.(खाजगी रुग्णालयातील 80% बेड्स कोविड 19 रुग्णांसाठी राखीव, उपचारांचे दरही निश्चित; राज्य सरकाराचा महत्त्वपूर्ण निर्णय)
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना संक्रमितांचा आकडा 41642 वर पोहचला असून एकूण 1454 जणांचा बळी गेला आहे. राज्यात कोरोनाचा वेग संथ करण्यास यश आले असले तरीही त्याची साखळी अद्याप तुटलेली नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. येत्या 31 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश कायम राहणार आहेत. तर रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन मधील कोरोनाची परिस्थिती पाहून लॉकडाउनचे काही नियम शिथील करण्यात आले आहेत.