ठाण्यात (Thane) भिवंडी (Bhiwandi) मध्ये एका लाकडी फर्नीचरच्या गोदामाला लागलेल्या आगीत 40 दुकानं जळून खाक झाल्याची माहिती आज (16 ऑक्टोबर) प्रशासकीय अधिकार्याने दिली आहे. कशेळी (Kasheli) टोल नाका जवळ असलेल्या या फर्निचर मार्केटला (Furniture Godown) शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास आग लागली होती. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
गोदामातील एका दुकानाला आग लागली आणि पाहता पाहता ही आग पसरत गेली. दरम्यान या आगीत 40 दुकानं पूर्णपणे जळून भस्मसात झाली आहे. अशी माहिती ठाणे महानगरपालिकेचे Regional Disaster Management Cell चे संतोष कदम (Santosh Kadam) यांनी PTI वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले आहे. नक्की वाचा: Mumbai: अग्निशमन दलाच्या ताफ्तात दाखल होणार कोट्यावधींची नवी गाडी; इमारतीच्या 50 मजल्यापर्यंत आग विझवण्यास सक्षम.
फर्निचर गोदामातील आगीची दृष्य
#WATCH | Maharashtra: Fire breaks out at a furniture godown in Kasheli locality of Bhiwandi, Thane.
One fire engine has been pressed into action. No casualties have been reported. The firefighting operation is underway. pic.twitter.com/hZOFdNig6P
— ANI (@ANI) October 15, 2021
दरम्यान ठाणे आणि भिवंडी मधील अग्निशमन दलातील वाहनं घटनास्थळी रवाना करण्यात आली आहेत. या आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेले नाही. पण आज (16 ऑक्टोबर) सकाळी 4.45 च्या सुमारास आग नियंत्रणात आणण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलं आहे.