ठाणे (Thane) येथील एका ज्वेलर्समधून तब्बल 1.5 कोटी रुपयांचे दागीने गायब झाले आहे. ज्वेलर्समालक असलेल्या सराफाने दिलेल्या तक्रारीमध्ये पेढीतील कर्मचाऱ्यांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. शोरूम मालकाच्या तक्रारीनुसार, आरोपी गेल्या दोन वर्षांपासून त्याच्या आस्थापनात काम करत होता आणि दिवसअखेरीस कपाटात सोने ठेवण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अभय महाजन यांनी वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना सांगितले की, ज्वेलर्समालकाने दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मालकाने दुकानातील दागिण्यांची पडताळणी केली असता त्यांना आढळून आले की आरोपीच्या थेट देखरेखीखालील 70 सोन्याच्या वस्तू गायब झाल्या आहेत. सर्व वजन मिळून या वस्तू जवळपास दीड किलो वजनाच्या होत्या. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मात्र या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे पोलिसांनी पीटीआयने सांगितले. (हेही वाचा, Electric Motorbike Battery Explodes in Thane: कळवा मध्ये घरात इलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरीचा स्फोट; 3 जखमी)
पोलिसांनी आणखी एका घटनेबाबत सांगितले की, आठ जणांनी पोलीस असल्याचा बहाणा करुन ठाणे जिल्ह्यात कुरिअर कंपनीचे वाहन अडवले आणि त्यातून त्यातून 5.4 कोटी रुपयांची रोकड चोरल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगावहून मुंबईकडे निघालेले हे वाहन 14 मार्च आणि 15 मार्चच्या मध्यरात्री हे वाहन लक्ष्य करण्यात आले. आरोपी इनोव्हाने कारने आले होते. त्यांनी ठाणे जिल्ह्यातील आटगावजवळ कुरिअर कंपनीची कार अडवली. पोलीस असल्याचे दाखवून, त्यातील काही जण जबरदस्तीने कारमध्ये चढले आणि त्यांनी गाडी रस्त्यापासून काही अंतरावर नेली, असे अधिकाऱ्याने सांगितले, पीटीआयने वृत्त दिले. आरोपींनी वाहनाची झडती घेण्याच्या बहाण्याने वाहनातून 5.4 कोटी रुपयांची रोकड असलेल्या दोन गोण्या बाहेर काढल्या आणि घटनास्थळावरून पळ काढला, असेही या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, तक्रार मिळाल्यानंतर, शहापूर पोलिसांनी 17 मार्च रोजी आठ अनोळखी व्यक्तींविरुद्ध लोकसेवकांची तोयतागिरी, चुकीचा प्रतिबंध आणि भारतीय दंड संहितेअंतर्गत फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या एका घटनेत, नवी मुंबईतील उरण येथे जमिनीच्या हस्तांतरणासाठी 76 लाख रुपये घेऊन लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील डोंबिवली येथील एका 52 वर्षीय व्यक्तीच्या तक्रारीवरून शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला, असे अधिकाऱ्याने सांगितले. फिर्यादीनुसार, चाणजे येथील 51 'गुंठे' जमिनीसाठी त्याने आणि इतर काहींनी 76 लाख रुपये आरोपींना दिले. जमिनीच्या नोंदणीसारख्या औपचारिकता पूर्ण न केल्याचा आरोप त्या व्यक्तीवर आहे. कोणालाही अटक करण्यात आलेली नाही आणि चौकशी सुरू आहे.