ठाणे (Thane Crime) पोलिसांनी एका 45 वर्षीय इसमाला मुंबईतील माहीम येथून अटक केली आहे. त्याच्यावर सहा वर्षांच्या चिमूकलीवर लैंगिक अत्याचार (Sexually Assaulting) केल्याचा आरोप आहे. पेशाने मिस्त्री असलेला हा इमस मूळचा पश्चिम बंगालचा आहे. लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. मात्र, ठाणे येथील कापूरबावडी (Kapurbawdi Police) पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन गुन्हा नोंद केला आणि आरोपीचा कसून शोध घेतला. पोलीस तपासात आरोपी माहिमला (Mahim ) असल्याचे समजताच पोलिसांनी तिथे जाऊन आरोपीला अटक केली.
ठाणे येथील कापूरबावडी हद्दीत नागरिकांनी सायंकाळी साडेचारच्या सुमारास एक चिमूकली रडताना पाहिली. ती मुलगी असहय्य वेदणेने तळमळत होती. नागरिकांनी तिच्याकडे विचारपूस केली. दरम्यान, तिच्या गुप्तांगातून मोठ्या प्रमाणावर रस्तस्त्रावही होताना आढळला. नागरिकांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पीडितेला सोबत घेऊन जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या वेळी डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. (हेही वाचा, Mumbai Crime: मुलींच्या वसतिगृहात 19 वर्षीय तरुणीचा सापडला मृतदेह, तर काही अंतरावर आढळला तरुणाचा मृतदेह; पोलिसांना खून आणि बलात्काराचा संशय)
चिमूरडीवर अत्याचार झाल्याची घटना पाहून पोलिसही हादरून गेले. पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध घेण्यास आणि तपासास सुरुवात केली. त्यासाठी एक पथकही तयार करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी आरोपला ट्रेस करुन त्याचा माग काढला. प्राप्त माहितीनुसार, चुरका शरण (छोरने) उर्फ दादू असे आरोपीचे नाव आहे. तो 45 वर्षांचा आहे. कापूरबावडी पोलिसांनी त्याला मुंबई येथील माहीम परिसरातून अटक केली. आरोपीवर भारतीय दंड संहिता आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडितेवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून, तिची प्रकृती स्थिर आहे.
लैंगिक अत्याचारांच्या घटनेत अलिकडील काही काळांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यातही लहान मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार अधिक चिंतेचे ठरत आहे. पोलीस आणि सामाजिक पातळीवर हे अत्याचार रोखण्यासाठी विविध उपाय राबवले जातात. जनजागृतीही केली जाते. तरीही अशा प्रकारच्या घटना घडत असतात. त्यामुळे हे प्रकार रोखायचे तरी कसे हा मोठाच प्रश्न पोलीस आणि समाजासमोरही उभा ठाकला आहे. बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी कायद्यातही कठोर तरतूद करण्यात आलेली आहे.