ठाण्याच्या Viviana Mall मध्ये राडेबाजी प्रकरणात अटकेत असलेल्या Jitendra Awhad यांना 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी
Jitendra Awhad | (Photo Credits: Facebook)

ठाण्याच्या (Thane)  विवियाना मॉल (Viviyana Mall)  मध्ये 'हर हर महादेव' (Har Har Mahadev) सिनेमा दरम्यान गोंधळ घालत प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना काल (11 नोव्हेंबर) अटक करण्यात आली. यानंतर आज कोर्टाने सध्या त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली आहे. जितेंद्र आव्हाड आव्हाड यांनी सध्या जामीनासाठी अर्ज केला असून पुढील काही तासांत आता त्यांची सुटका होणार की आजची रात्रही तुरूंगामध्ये जाणार याकडे सार्‍यांचे लक्ष लागले. जितेंद्र आव्हाडांच्या अटकेनंतर ठाण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

अभिजित देशपांडे दिग्दर्शित 'हर हर महादेव' सिनेमामध्ये ऐतिहासिक घटनांची तोडमोड करून दाखवली आहे तसेच चूकीचा इतिहास लोकांसमोर जात आहे. यावरून जितेंद्र आव्हाड सिनेमागृहात घुसले होते. त्यांनी शो बंद पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका प्रेक्षकाने शो बंद केला तर आमचे पैसे परत द्या अशी मागणी केली तर त्याला मारहाण केली. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्त्वाखाली त्यांचे काही समर्थकही घुसले होते. नक्की वाचा: 'हर हर महादेव' सिनेमाच्या वादावर दिग्दर्शक अभिजीत देशपांडेंनी भूमिका स्पष्ट करत विरोधकांना सुनावलं; 'त्यांच्याकडूनच अपमान झाल्याने शिवरायांसह महाराष्ट्राच्या माफी' ची मागणी .

दरम्यान काल या राडेबाजीवरून पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांना ताब्यात घेतलं. त्यावेळी ट्वीट करत आव्हाडांनी पोलीसी बळाचा गैरवापर करत आपल्याला अटक करण्यात आली आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही. असं म्हटलं आहे.