ठाणे पोलिसांच्या (Thane Police) खंडणीविरोधी पथकाने (Anti-Extortion Squad) उल्हासनगर येथून 15 महिलांची यशस्वीरित्या सुटका केली आहे. या महिलांना मूळच्या थायलंड (Thailand Women Trafficking) या देशातील असून, त्यांना कथीतपणे तस्करी करून भारतात आणण्यात आले. तसेच, भारतात आल्यावर त्यांना वेश्याव्यवसाय (Prostitution Racket) करण्यास प्रवृत्त करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. एका गुप्त माहितीच्या आधारे मंगळवारी रात्री उल्हासनगर येथील एका इमारतीत ही कारवाई करण्यात आली, असे पोलिसांनी म्हटले आहे.
आरोपींना घटनास्थळावरुन अटक
पोलिसांकडून या प्रकरणात, सितारा लॉजिंग अँड बोर्डिंगचा व्यवस्थापक कुलदीप ऊर्फ पंकज जयराज सिंग (37) आणि त्याच्या चार साथीदारांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम 143 (1) आणि 143 (3) आणि अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायदा 1956 अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था मानवी तस्करीच्या मोहिमेत सामील असलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेत आहेत. (हेही वाचा, Human Trafficking And Prostitution Mumbai: मुंबई येथील वेश्याव्यवसाय दलालास मानवी तस्करी प्रकणात 10 वर्षांचा तुरुंगवास)
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील मोहीम
ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस उपायुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली बचावकार्य करण्यात आले. सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या नेतृत्वाखालील कृती दलात निरीक्षक नरेश पवार, सुनील तारामळे, विजयकुमार राठोड आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता, ज्यांनी छापाच्या यशात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. (हेही वाचा, Prostitution Racket Busted in Chennai: चेन्नईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 14 वर्षांच्या बहिणीला देहविक्रीच्या व्यवसायात ढकलणाऱ्या आरोपी बहिणीसह 5 जणांना अटक)
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्हासगनर येथील पीडित महिलांना थायलंड येथून मोठ्या आर्थिक संधी आणि नोकरीचे आमिश दाखवून भारतात आणण्यात आले होते. मात्र, भारतात आल्यावर त्यांना नोकरी देणे तर दुरच. उलट त्यांना सितारा लॉजिंग आणि बोर्डिंग येथे वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले गेले. खंडणीविरोधी पथकाला तस्करीच्या रॅकेटची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले. पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीची पडताळणी करुन घेतली. माहिती खरी असल्याची खात्री पटताच पोलिसांनी मोहीम राबवली. मोहीम फत्ते होण्यासाठी काही तोतया ग्राहक आणि एजंट तयार करुन त्यांना सदर इमारतीत पाठविण्यात आले. त्यानंतर पोलीसांनी पुढील कारवाई केली.
ठाणे पोलिसांकडून वेश्यावसाय करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
𝟏𝟓 𝐠𝐢𝐫𝐥𝐬 𝐛𝐫𝐨𝐮𝐠𝐡𝐭 𝐟𝐫𝐨𝐦 𝐁𝐚𝐧𝐠𝐤𝐨𝐤 𝐭𝐚𝐤𝐞𝐧 𝐢𝐧 𝐜𝐮𝐬𝐭𝐨𝐝𝐲 𝐟𝐫𝐨𝐦 𝐚 𝐥𝐨𝐝𝐠𝐞 𝐢𝐧 𝐔𝐥𝐡𝐚𝐬𝐧𝐚𝐠𝐚𝐫 |
Anti Extortion Cell of Thane police raided Sitara lodge in Ulhasnagar, to find 15 girls from Thailand, brought for prostitution. Manager of the… pic.twitter.com/CsMKL4Pcxb
— MUMBAI NEWS (@Mumbaikhabar9) October 2, 2024
दरम्यान, ठाणे पोलिसांकडून उल्हासनगर येथील इमारतीत रात्री उशीरपर्यंत छापा आणि कारवाई सुरु होती. ज्यामध्ये जवळपास 15 महिलांना अटक करण्यात आले. त्यांची तातडीने वैद्यकीय तपासणी करण्यात आली. नंतर त्यांना पुनर्वसनासाठी मदत करणाऱ्या संस्थांकडे सोपवण्यात आले. अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरुन रोख 5,27,000 रुपये आणि ग्राहकांच्या खात्यांसह, मोबाईल फोन आणि इतर महत्त्वपूर्ण कागदपत्रांसह मोठ्या प्रमाणात पुरावे देखील जप्त केले. वेश्याव्यवसाय वर्तुळाशी संबंधित अतिरिक्त संशयितांना ओळखण्यासाठी तपास सुरू आहे.