मुंबई झोनच्या ठाणे आयुक्तालयाच्या सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स (CGST) च्या अँटी इव्हेशन विंगने (Anti-Aviation Wing) एका जोडप्याला 12.23 कोटी रुपयांच्या GST चोरी प्रकरणी अटक (Arrest) केली आहे. आयुक्तांनी दावा केला की ही पहिली अटक आहे. ज्यात ग्राहकांकडून वसूल केलेला जीएसटी सरकारी तिजोरीत जमा केला गेला नाही. या जोडप्याने कथितपणे एक वर्षापेक्षा जास्त काळ GST चुकवला आणि आता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. CGST, ठाण्याचे आयुक्त राजन चौधरी म्हणाले, तपशीलवार डेटा मायनिंग आणि डेटा विश्लेषणामुळे आम्हाला ठाण्यातील सल्लागार कंपनीकडे नेले. आम्ही त्यांच्याविरुद्ध चौकशी सुरू केली. फर्मने विविध हाय-प्रोफाइल कंपन्यांना मनुष्यबळ पुरवले.
फर्मने कथितपणे ग्राहकांकडून GST गोळा केला होता परंतु CGST कायदा 2017 च्या तरतुदींचे उल्लंघन करून एका वर्षापेक्षा जास्त काळ सरकारी तिजोरीत हा GST जमा केला नव्हता. ही फर्म आरोपी दाम्पत्य, 50 वर्षीय पुरुष आणि त्याची 48 वर्षीय पत्नी चालवतात. चौधरी पुढे म्हणाले, आम्ही सीजीएसटी कायदा 2017 च्या कलम 69 अंतर्गत 3 फेब्रुवारी रोजी दोघांना अटक केली. त्यांना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी, ठाणे यांच्यासमोर हजर केले. त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. हेही वाचा Crime: मुंबईत समलिंगी व्यक्तीचा छळ करणार्या व्यक्तीची हत्या, दोघांना अटक
दोषी सिद्ध झाल्यास या जोडप्याला पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागेल. हे प्रकरण CGST, मुंबई झोनने कर चुकवणारे आणि फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध सुरू केलेल्या अँटी-इव्हेशन मोहिमेचा एक भाग आहे. CGST ठाणे आयुक्तालयाने या मोहिमे दरम्यान, गेल्या पाच महिन्यांत ₹ 1,023 कोटींची करचोरी शोधून काढली आहे. 17 कोटी वसूल केले आहेत आणि सहा जणांना अटक केली आहे.