Aarakshan | PC: Rajesh Tope Twitter Account

मराठा आरक्षण आंदोलनामध्ये (Maratha Aarakshan Andolan) मृत्यूमुखी पडलेल्या 42 आंदोलकांना महाराष्ट्र राज्य सरकारकडून  (Maharashtra Government) आर्थिक मदत आणि नोकरी देण्यात आली आहे. मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबाला सरकारने प्रत्येकी 10 लाख रूपयांची मदत केली आहे. तर 42 पैकी 11 जणांच्या कुटुंबियांना एसटी महामंडळामध्ये (MSRTC) नोकरी देण्यात आली आहे. उर्वरित काहींच्या नोकरीचे काम प्रगतीपथावर असल्याचेही मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. तर 20 आंदोलकांच्या कुटुंबातील व्यक्ती लहान असल्याने त्यांचा नोकरीचा अधिकार राखीव ठेवण्यात आला आहे.

मराठा आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून लढा पुकरला जात आहे. हळूहळू त्याचं लोण राज्यभर पसरलं आणि एकजूटीने आरक्षण मिळवलं देखील. मात्र सध्या सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर बंदी घातली आहे. पण या लढ्यात ज्या तरूणांनी जीव गमावला त्यांच्या कुटुंबातील सदस्याला नोकरी मिळावी अशी मागणी वारंवार केली जात होती. त्यानुसार शुक्रवार 10 डिसेंबर दिवशी चेक चे वाटप करण्यात आले आहे. राजेश टोपेंनी जालना मध्ये त्यांच्या जिल्ह्यांत मराठा आरक्षण लढ्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना धनादेश सुपूर्द केले आहेत. Maratha Caste Certificate : जात प्रमाणपत्र ऑनलाईन, ऑफलाईन मिळवण्यासाठी अर्ज कसा कराल? त्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती? 

राजेश टोपे ट्वीट

34 कुटुंबियांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील 6 कुटूंब, जालनामधील 3 कुटूंब, बीडमधील 11 कुटूंब, उस्मानाबादमधील 2 कुटूंब, नांदेडमधील 2 कुटूंब, लातूरमधील 4 कुटूंब, पुण्यातील 3 कुटूंब, तर अहमदनगर, सोलापूर आणि परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी एका कुटुंबाला समाविष्ट करण्यात आले आहे.