महाराष्ट्रामध्ये टीचर्स एजिबिलिटी टेस्ट यंदा सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. नुकतीच पुण्याच्या महाराष्ट्र स्टेट काऊंसिल ऑफ एक्झामिनेशन कडून त्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान शिक्षणक्षेत्रामध्ये शिक्षकी पेशा स्वीकारू इच्छिणार्या उमेदवारांना ही टीचर्स एजिबिलिटी टेस्ट पार करणं आवश्यक आहे. 19 जानेवारी 2019 मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच TET योग्यता प्रमाणपत्राची वैधता आता 7 वर्षावरून आजीवन करण्यात आल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मोदी सरकारने केली होती. त्यामुळे आता अनेकांना या परीक्षेबाबत उत्सुकता वाढली आहे.
टाईम्स ऑफ इंडिया सोबत बोलताना, MSCE चे कमिशनर तुकाराम सुपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, TET 2021ही ऑफलाईन घेतली जाणार आहे. यामध्ये ऑप्टिकल मार्क्स रेकक्निशन च्या आधारे ही परीक्षा होणार आहे. जुलै 2021 मध्ये या परीक्षेसाठी फॉर्म भरण्यास सुरूवात होणार आहे. आम्ही ऑनलाईन जाण्याचा विचार करत होतो पण त्यासाठी अजून काही काळ जाईल. सध्या ही परीक्षा ऑफलाईन माध्यमातूनच घेतली जाणार आहे.
महाराष्ट्रात पहिल्यांदा टीईटी परीक्षा 2013 साली घेण्यात आली होती. त्यानंतर सहा वेळेस परीक्षा घेण्यात आल्या आहेत. 2019 ला राज्यात शेवटची टीईटी झाली होती. मागील वर्ष दीड वर्षात राज्यात असलेलं कोरोना संकट पाहता या परीक्षेचं आयोजन करण्यात आलेले नाही. जानेवारी महिन्यात ही परीक्षा होणं अपेक्षित होते पाण तेव्हा देखील कोरोनामुळे ही परीक्षा लांबणीवर पडल्याने आता सप्टेंबर 2021 मध्ये टीईटी 2021 परीक्षेचं आयोजन केले जाणार आहे.