Koyta Gang In Pune (फोटो सौजन्य - X/@pulse_pune)

Koyta Gang In Pune: पुण्यात कोयता गँग (Koyta Gang) ची दहशत कमी होण्याचं नाव घेत नाहीये. पुणे शहरातील कोंडवा (Kondhwa) परिसरातील लक्ष्मी नगर येथे मंगळवारी रात्री कुख्यात कोयता गँगच्या टोळीने अनेक वाहनांची तोडफोड केली. ही घटना तेथील CCTV मध्ये कैद झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फुटेजमध्ये ही टोळी लेन क्रमांक 4 वर तोडफोड करताना दिसत आहे, ज्यामध्ये जवळपास एक डझन वाहनांचे नुकसान झाले आहे.

वृत्तानुसार, या हल्ल्यात नऊ दुचाकी, एक ऑटो रिक्षा आणि एक चारचाकी वाहनासह किमान 10 ते 12 वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. हल्ल्यामागील हेतू अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये घबराट आणि चिंता पसरली आहे. घटनेनंतर, सुमारे 12 ते 14 प्रभावित व्यक्तींनी औपचारिक तक्रार दाखल करण्यासाठी कोंढवा पोलिस ठाण्यात संपर्क साधला. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवले असून पोलिस या प्रकरणाची सविस्तर चौकशी करत आहेत. (हेही वाचा - Koyta Gang Video Pune: पुणे येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी कॉलेज कॅम्पसमध्ये राडा, विद्यार्थ्यांच्या दोन गटात कोयता हल्ला (Watch))

पहा व्हिडिओ -

दरम्यान, कोंढवा पोलिसांनी सांगितले की, सध्या गुन्हेगारांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. आम्ही सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक पुराव्यांचे बारकाईने विश्लेषण करत आहोत. आरोपींना लवकरच अटक केली जाईल. तसेच दोषी आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.