Accident (PC - File Photo)

बीडमध्ये (Beed Accident) मित्राच्या लग्नाला जात असताना एका भरधाव वेगातील गाडीचा भीषण अपघात झाला आहे. गाडी भरधाव वेगात असतांना चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने गाडीने 3- 4 पलट्या खाल्ल्या आहेत.  या भीषण अपघातात गाडीमधील 3 तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा भीषण अपघात बीड- संभाजीनगर महामार्गावरील पेंडगावजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झाला आहे. यातील जखमीवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Ulhasnagar Crime: उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात जुन्या भांडणाच्या रागातून हत्येचा प्रयत्न)

हे चार जण मित्राच्या लग्नासाठी जात असताना हा अपघात घडला आहे. यावेळी अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कारने रस्त्यावर तीन ते चार पलट्या घेऊन रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाली. यामध्ये गाडीचा अक्षरशः चुराडा झाला आहे धीरज गुणदेजा वय 30, रोहन वाल्हेकर वय 32, विवेक कांगुने वय 33 अशी मयतांची नावे आहेत. तर आनंद वाघ वय 28 हा गंभीर जखमी असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे सर्व अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील रहिवासी आहेत.

या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, बीड ग्रामीण पोलीस तसेच महामार्ग पेट्रोलिंग टीम यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, या घटनेने बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे