Representational image (Photo Credit- IANS)

उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) सध्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशा वेळी पुन्हा एकदा उल्हासनगरमधून एक धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ वादातून तरुणाच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना उल्हासनगर रेल्वे स्टेशन (Ulhasnagar Railway Station) परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. (Mira Road Murder Case: मीरा रोड खून प्रकरणातील आरोपी मनोज सानेला 6 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी)

उल्हासनगर कॅम्प चार मधील मराठा सेक्शन परिसरात राहणारा मृगण हा इडली विक्री व्यवसायाच काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. रात्रीच्या सुमारास मृगण हा रेल्वे स्टेशन परिसरात त्याच्या हॉटेलमध्ये काम करताना मृगण याला भूक लागल्याने तो बाहेर आला. मात्र यावेळी मृगण याला काहीच न समजतात सात ते आठ जणांचे टोळीने तलवार रॉडच्या साह्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात मृगण हा गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्नाच्या गुन्ह्यात आरोपी अजय, कुबड्या, गण्या आणि चेतन यांना अटक करण्यात आली आहे. तर उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. जुन्या रागाच्या भांडणाच्या रागातून हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती मिळाली.

दरम्यान उल्हासनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनैतिक संबंध, कौटुंबिक कलह, महिलांवरील अत्याचार, आर्थिक फसवणूक यातून हत्या आणि आत्महत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.