जुनी पेन्शन योजना यांच्यासह अन्य प्रमुख मागण्या पूर्ण होण्यासाठी शिक्षकांचा आज एकदिवसीय लाक्षणिक संप
प्रतिकात्मक फोटो| (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

राज्यातील विविध शाळांच्या शिक्षकांनी आज एकदिवसीय संपाची हाक दिली आहेत. त्यामुळे शाळा बंद राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर शिक्षकांनी जुनी पेशन्श योजना यांच्यासह अन्य प्रमुख मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन संप पुकारला आहे. परंतु जर सरकारने या शिक्षक संघटनांच्या मागण्यांकडे कानाडोळा केल्यास 11 सप्टेंबर पासून पुन्हा एकदा बेमुदत संपाची हाक देण्यात येईल असा इशारा दिला आहे.

पुकरालेल्या संपामध्ये जवळजवळ 32 शिक्षक संघटना यांचा सहभाग असणार आहे. तसेच संपाची हाक देण्यासाठी सर्व शिक्षक संघटना मोर्चा घेऊन आज आझाद मैदानावर धडकणार असल्याचे ही सांगितले जात आहे. या संपासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि शिक्षक भरती यांनी त्यांचा पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे आज राज्यातील शाळा बंद राहणार आहेत. परंतु पुकारलेल्या संपात काही फूट असल्याची बाब समोर आली आहे. तर 2005 नंतर रुजू झालेल्या शिक्षक-शिक्षकेतर यांच्यासह शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना याच्यासह अन्य प्रमुख प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी संपाची हाक दिली आहे.(मुंबई: रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात 47 वर्षीय रिक्षा चालकाचा मृत्यू; तीन मुली व बायको असा परिवार उघड्यावर)

महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीमार्फत एक दिवसीय लाक्षणिक संपाची हाक देण्यात आली आहे. मात्र काही सिक्षक संघटनांनी गणेशोत्सवानंतर शाळा बंद आंदोलन करण्याचे ठरवले होते. तरीही समितीकडून 9 सप्टेंबर रोजी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याच मुद्द्यावरुन काही संघटनांमध्ये फूट पडल्याचे सांगण्यात येत आहे.