आपल्या जीवनात आई वडिलांनंतर शिक्षकाला महत्वाचे स्थान दिले जाते. परंतु, कल्याण (Kalyan) येथे एका शिक्षकाने आपल्या शाळेतील अल्पवयीन मुलींना ब्लॅकमेल करून त्यांचा लैंगिक छळ करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना कल्याण येथील मोहने परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला शिक्षकाला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.याशिवाय, शाळा प्रशासनाने आरोपीला सेवेतून बडतर्फ केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात एकच मुलींचा सहभाग नसून आरोपी शिक्षकाने गेल्या अनेक महिन्यांपासून तब्बल 6 मुलींचा लैंगिक छळ केल्याची उघडकीस झाले आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पुन्हा एकदा महिला सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
विजय मेटकर असे या घटनेतील आरोपीचे नाव आहे. शिक्षक विजय मेटकर हा काही महिन्यांपासून शाळेतील विद्यार्थिंनींवर लैगिंक अत्याचार करत होता. हा घडलेला प्रकार एका मुलीने आपल्या आईला सांगितल्यावर तो उघडकीस झाला. मेटकर याने एकाच मुलीसोबत लैगिंक अत्याचार केला नसून तब्बल सहा मुलींसोबत असा प्रकार केल्याचे समोर आले आहे. मुलींनी हा प्रकार कोणाला सांगू नये त्यासाठी तो विद्यार्थिनींना ब्लॅकमेल सुद्धा करीत होता. या घटनेनंतर टिटवाळा येथील पोलिसांनी शाळेतील सर्व मुलींच्या पालाकांना विश्वासात घेऊन विजय मेटकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टिटवाळा पोलिसांनी आरोपी विजय मेटकर याला न्यायालयात हजर केले असताना त्याला 24 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. तसेच मेटकर यांनी याआधीही अनेक मुलींवर लैंगिक अत्याचार केला असावा, असाही संशय पोलीस व्यक्त करत आहेत. हे देखील वाचा- मुंबई: पाच वर्षांच्या चिमुकलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी स्कूल व्हॅन चालकाला 5 वर्षाची शिक्षा
सध्या महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. तसेच यावर आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी एका नराधमाने भररस्त्यात एका शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले होते. यात संबंधित शिक्षिकेचा मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच आरोपीला लवकरात लवकरात फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशीही मागणींनी जोर धरला आहे.