Tata Sons यांच्याकडून राज्यसरकाला 20 रुग्णवाहिका, 100 व्हेंटिलेटर्सह 10 कोटींचा निधी दान केल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती
Chief Minister Uddhav Thackeray's (PC - Twitter)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. तर प्रत्येक दिवसाला हजारोंच्या संख्येने नव्याने कोरोनाबाधितांची वाढ होत असल्याचे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाग्रस्तांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य सरकार कोविड आणि क्वारंटाइन सेंटर्सची उपलब्धता करुन देत आहेत. तसेच सरकार आता ऑक्सिजनची सोय असणाऱ्या बेड्स उपलब्ध करुन देण्याकडे अधिक भर देत आहेत. याच दरम्यान आता टाटा सन्स (Tata Sons) यांच्याकडून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्य सराकारला मदतीचा हात पुढे केला आहे.(Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात मुंबई, पुणे, रत्नागिरीसह अन्य जिल्ह्यात किती आहेत कोरोनाचे रुग्ण, जाणून घ्या आजची जिल्हानिहाय आकडेवारी)

टाटा सन्स यांनी राज्य सरकारकडे 20 रुग्णवाहिका, 100 व्हेंटिलेटर्स आणि 10 कोटी रुपयांचा निधी सुपूर्द केला आहे. टाटा सन्स यांनी केलेले दान राज्य सरकारला मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व स्तरातून राज्य सरकारच्या सीएम फंडमध्ये निधी जमा करण्यात आला आहे. हा निधी कोरोनाबाधित रुग्णांसह गरजूंसाठी वापरला जातो. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांवर डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून अहोरात्र उपचार करण्यात येत आहेत. तसेच कोविड वॉरिअर्स सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावताना दिसून येत आहेत. (महाराष्ट्रात 8 जुलैपासून हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस उघडण्यास परवानगी; राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर)

दरम्यान, महाराष्ट्रात रविवार (5 जुलै) दिवसभरात 6 हजार 555 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 125 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचीसंख्या 2 लाख 6 हजार 619 वर पोहचली आहे. यापैकी 8 हजार 822 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 11 हजार 740 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणूला आटोक्यात आणण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र या सोबत नागरिकांनी सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.