Sword Attack On Mumbai Lawyer: बोरिवली परिसरामध्ये वकिलावर तलावारीने हल्ला; मुंबई पोलिसांकडून 3 जणांना बेड्या
Sword Attack On Mumbai Lawyer| PC: Twitter/ ANI

मुंबई मध्ये एका वकिलावर तलावारीचे हल्ले झाल्याचे वृत्त समोर आले आहे. ही घटना 8 जुलैची असून मुंबईतील बोरिवली मधील आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार हल्ला झालेल्या वकिलाचे नाव सत्यदेव जोशी असे आहे. एका न्यायालयीन खटल्याशी संबंधित मतभेदातून हा हल्ला झाल्याचा प्राथामिक अंदाज आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणी FIR नोंदवून घेतला असून संबंधित प्रकरणाचा तपास सुरू आहे. ANI वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, या घटनेमध्ये तीन जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच सदर प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

8 जुलै दिवशी घडलेली ही घटना मोबाईल कॅमेर्‍यामध्ये कैद झाली आहे. त्यामध्ये सत्यदेव जोशींवर हल्ला होत असल्याची दृष्य स्पष्ट दिसत आहेत. त्यावरूनच पोलिसांनी पुढील कारवाई केली आहे. ही घटना बोरिवली पश्चिम भागातील असून एमएचबी पोलिसांनी या प्रकरणी तिघांना आतापर्यंत बेड्या ठोकल्या आहेत. कलम 307, 326,324, 504 आणि 506 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा देखील आहे.

ANI Tweet

खेदजनक बाब म्हणजे 8 जुलै दिवशी अशाप्रकारे वकिलावर हल्ला होणारी ही दुसरी घटना होती. न्यायालयात सुरु खटल्यामध्ये वकीलपत्र सोडून दे, नाहीतर जीव घेऊ, अशी धमकी देत उस्मानाबादमध्ये वकिलावर एका डॉक्टर कडून देखील हल्ला झाल्याची गोष्ट समोर आली आहे. डॉ अरुण मोरे असे आरोपीचे नाव असून त्याच्यासह अन्य तिघांना अटक झाली आहे. तसेच डॉ. मोरे यांनी आपल्या वकील मेव्हण्यावरच हल्ला केल्याचं समोर आलं आहे.